Movatterモバイル変換


[0]ホーム

URL:


शिवसेना

शिवसेना (Shivsena) हा महाराष्ट्रातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. शिवसेनेची स्थापना बाळ ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी १९ जून १९६६ रोजी केली. मुंबईमध्ये (Mumbai) मराठी माणसांवर होणारा अन्याय अत्याचाराच्या विरोधात शिवसेनेची स्थापना झाली.


शिवसेनेने १९८९ साली बाळासाहेब ठाकरे, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली भाजप पक्षाबरोबर युती केली व १९९५ साली महाराष्ट्रात शिवसेना भाजप युतीचे सरकार अस्तित्वात आले व शिवसेनेचे मनोहर जोशी हे राज्याचे मुख्यमंत्री झाले. तसेच केंद्रात १९९९ साली अस्तित्वात आलेल्या अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये सेनेचे मनोहर जोशी हे नंतर लोकसभा अध्यक्ष झाले होते. २०१४ साली शिवसेना व भाजप यांची युती तुटली दोन्ही पक्ष वेगळे लढले व पुन्हा एकदा एकत्र येत सरकार स्थापन केले.


२०१९ साली शिवसेनेचे १८ खासदार निवडून आले, विधानसभा निवडणूक दोन्ही पक्षांनी एकत्र लढवली पण मुख्यमंत्री पदावरून दोघांमध्ये वाद झाला व युती तुटली. शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस यांच्याबरोबर महाविकास आघाडी स्थापन केली व उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे १९ वे मुख्यमंत्री झाले. मात्र २०२२ मध्ये शिवसेनेमध्ये फुट पडली. शिवसनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत आपला वेगळा गट स्थापन केला. त्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार पडले. पक्षातील बहुसंख्य आमदारांसह एकनाथ शिंदे यांनी भाजपासोबत राज्यात सरकार स्थापन केले. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद मिळाले तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारली.

बंडानंतर एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षावर आणि चिन्हावर दावा केला होता. निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे गटाला दिले. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नाव बदलले आणि पक्षाचे चिन्हदेखील बदलले. पक्षाला मशाल हे चिन्ह मिळाले.

असली नकली शिवसेनेवरून दोन्ही गटांमध्ये जोरदार खटके उडाले. निवडणुकीत बघून घेण्याची भाषा झाली. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने दोन्ही गटांची ताकद स्पष्ट झाली. महाविकास आघाडीने ४८ पैकी ३० जागा मिळवत राज्यात दणदणीत विजय मिळवला. महायुतीला १७ जागांवरच विजय मिळवता आला. या निवडणुकीत एकनाथ शिंदे गटाला महायुतीत १५ जागा मिळाल्या होत्या. त्यापैकी त्यांना ७ जागा जिंकण्यात यश आले. तर, उद्धव ठाकरे गटाला मिळालेल्या २१ जागांपैकी ९ जागांवर विजय मिळाला. निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचा स्ट्राईक रेट हा ठाकरे गटापेक्षा अधिक होता. मात्र निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाला मिळालेली एकूण मते ही शिंदे गटापेक्षा अधिक आहेत. मुंबईत उद्धव ठाकरे गटाने गड राखला तर शिंदे गटाने ठाणे, कल्यणामध्ये आपले वर्चस्व असल्याचे दाखवून दिले.


मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, कांदा प्रश्न, पिकांना हमीभाव यासह विविध कारणांमुळे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वातील सरकारला लोकसभेच्या निवडणुकीत अपेक्षित यश मिळाले नसल्याचे बोलले जाते.


Read More
badlapur bjp leader Damayanti pawar returns to bjp after two days shinde sena entry

तर भाजपची हीच खरी संस्कृती असून आपल्या लोकांना सामावून घेण्याची संस्कृती इतर कुठेही नाही, असे यावेळी आमदार किसन कथोरे यांनी…

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात जाहीर सभा घेतली (छायाचित्र @mieknathshinde)

एकनाथ शिंदे यांनी भाजपाची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे. २००५ साली मोहोळमध्ये झालेल्या पंडित देशमुखांच्या खून प्रकरणावरून त्यांनी भाजपाच्या नेत्याला…

shambhuraj desai

फलटण येथील श्रीराम मंदिर परिसरात फलटण पालिकेच्या प्रचारासाठी आयोजित शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाच्या जाहीर सभेत देसाई बोलत होते.

Political equations shift in Marathwada as ruling alliances dominate municipal elections without visible opposition

मराठवाड्यात अनेक नगरपालिकांत सत्ताधारीच एकमेकांविरुद्ध उभे राहिल्याने ‘सत्ताधारी विरुद्ध सत्ताधारी’ अशी लढत रंगली आहे.

BJP internal conflict in Manmad municipal election

मनमाड भाजपमधील हा अंतर्गत संघर्ष केवळ पेल्यातील वादळ ठरेल की मोठे रुप धारण करेल, याकडे आता इतर पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचेही लक्ष…

Uday Samant big statement on shivsena bjp politics

Uday Samant on BJP: शिवसेना (शिंदे) आणि भाजपामध्ये आलबेल नसल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याची…

bhandara mahayuti allies fight each other in local elections bjp ncp shindesena mahavikas aghadi confusion polls

भाजप, शिंदे सेना आणि राष्ट्रवादी स्वतंत्रपणे रिंगणात उतरल्याने स्थानिक निवडणुकांत तिरंगी आणि चौरंगी लढतीचे संकेत स्पष्ट झाले.

Buldhana Municipal Polls Mahayuti Conflict BJP Shinde Sena Fight Local Elections

जिल्ह्यातील पालिका लढतीत युतीतील कलह आणि असमन्वय उफाळून आल्यामुळे महायुतीच्या ऐक्याची पोलखोल झाली आहे.

Thane BSUP Scheme Stamp Duty Row shinde Sena BJP Credit Fight Police Complaint Politics Mahayuti Allies Clashes

ठाण्यातील बीएसयुपी योजनेतील सदनिकाधारकांना १% मुद्रांक शुल्कात सवलत देण्याच्या निर्णयावरून शिंदे गट आणि भाजपमध्ये श्रेयवादातून वाद झाला.

CM Eknath Shindes

एकनाथ शिंदे यांनी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डहाणू येथे जाहीर सभा घेतली.डहाणूतील नागरिकांना परिवर्तन आणि विकासाची ठोस ग्वाही दिली. नगराध्यक्षपदाचे उमेदवार…

Buldhana Municipal Polls Mahayuti Conflict BJP Shinde Sena Fight Local Elections

अमरावती जिल्ह्यातील सहा नगरपालिकांमध्ये भाजप, शिंदे सेना आणि अजित पवार गटाने महायुतीचे विसर्जन करून एकमेकांसमोर आव्हान उभे केले.

Buldhana Politics BJP Leaders Join shivsena Shinde Shah Deal Broken Prataprao Jadhav Welcomes Mahayuti Conflict

चिखली पालिकेची निवडणूक लढणाऱ्या भाजपच्या वजनदार पदाधिकाऱ्यांनी थेट केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.

संबंधित बातम्या

Veteran actor Dharmendra’s 100-acre farm in Aundhe village reflected his generosity and community spirit.
Dharmendra : अभिनेते धर्मेंद्र यांचे मावळातील औंढे गावच्या ग्रामस्थांशी होते अनोखे नाते; १०० एकरवर…
Gauri Palve's Father Serious Allegations on Anant Garje
गौरी पालवेच्या वडिलांचा दावा; “माझ्या मुलीने आयुष्य संपवलं नाही, तिला मारहाण केली आणि..”
Banana for diabetes blood sugar control raw vs ripe banana which is better for diabetes
आयुष्यात कधीच होणार नाही डायबिटीजचा धोका, रक्तातील साखर राहील कंट्रोल; फक्त कच्चं खा ‘हे’ हिरवं फळ, घाण आतडेही होईल साफ
Guru Mithun transit
अखेर २०२६ मध्ये ‘या’ राशींच्या लोकांसाठी उघडणार उत्पन्नाचे नवे स्रोत? देवगुरुच्या वक्री शक्तीने लक्ष्मीच्या पावलांनी घरात पैसा येण्यास सुरुवात होणार!
Horoscope shani margi in meen rashi on 28 november
२८ नोव्हेंबरपासून ‘या’ राशींचं भाग्य रातोरात बदलेल; शनि होतोय मार्गी, २०२७ पर्यंत आशीर्वाद कायम, हातात खेळेल पैसाच पैसा
Claims of self-reliance in Parbhani are false; fighting is done by relying on allies for upcoming election
Brain cancer symptoms headache cancer sign early signs of brain cancer causes treatment
why Made in India arms that foreign militaries are lining up to purchase
पहिल्याच निवडणुकीत खासदार, तरीही धर्मेंद्र यांनी सोडले होते राजकारण; कारण काय? (छायाचित्र पीटीआय)
Sister steals the spotlight at brother’s wedding!

[8]ページ先頭

©2009-2025 Movatter.jp