Movatterモバイル変換


[0]ホーム

URL:


Jump to content
मराठी विकिपीडियाएक मुक्त ज्ञानकोश
शोध

विकी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
विकीचे निर्मातेवॉर्ड कनिंघम

विकी (Wiki / wiki) हे वापर करणाऱ्यांना उपलब्ध माहितीत भर घालायला, तसेच त्या माहितीचा वापर करणाऱ्यांना बदल किंवा दुरुस्त्या करण्यास मुभा देणारे एकतंत्रज्ञान आहे.

साधारणपणेइंटरनेट वर आढळणारी पाने (वेब पेजेस) जी माहिती पुरवतात, ती पानाच्या वाचकास बदलता येत नाहीत. विकी तंत्रज्ञानावर आधारित पानंमधील माहिती मात्र वाचकास बदलता येते.

विकीतील नाव नोंदणी मुळे विकीचे संपादन सुकर होते, पण बहुतेक वेळा नाव नोंदणी ही अत्यावश्यक बाब नाही. यामुळे एकत्र येउन लिखाण करण्याचे काम आणि संपर्क सुलभ रहाते.

विकी यासंकेतस्थळचे काम करणाऱ्या संगणक प्रणालीस सुद्धा विकी असे म्हणतात. विकीचे पहिले प्रारूप "विकीविकीवेब" हेवॉर्ड कनिंघम यांनी १९९५ मध्ये केले. हवाई (Hawaii) प्रदेशातील भाषेत 'विकी-विकी'चा अर्थ 'लौकर लौकर' किंवा 'चटपट' असा होतो.


अधिक माहिती

[संपादन]
"https://mr.wikipedia.org/w/index.php?title=विकी&oldid=2170020" पासून हुडकले
वर्ग:

[8]ページ先頭

©2009-2025 Movatter.jp