वॉर्सा (पोलिश:Warszawa (सहाय्य·माहिती), इंग्लिश लेखनभेदः Warsaw, वर्झावा) हीमध्य युरोपातीलपोलंड देशाची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे. वॉर्सा शहर पोलंडच्या मध्य-पूर्व भागातबाल्टिक समुद्रापासून २६० कि.मी. अंतरावरव्हिस्चुला नदीच्या काठावर वसले आहे. इ.स. २०१० साली वॉर्सा शहराची लोकसंख्या १७.१७ लाख तर महानगर क्षेत्राची लोकसंख्या सुमारे २६.३१ लाख इतकी होती. ह्या दृष्टीनेयुरोपियन संघात वॉर्साचा नववा क्रमांक लागतो.
इ.स.च्या १३व्या शतकाच्या सुरुवातीस स्थापन करण्यात आलेले वॉर्सा शहर इ.स. १४१३ साली माझोव्हिया प्रदेशाची राजधानी बनले. मध्यवर्ती स्थानामुळे इ.स. १५९६ साली वॉर्सालापोलिश-लिथुएनियन राष्ट्रकुलाची राजधानी बनवण्यात आले. त्यानंतरच्या अनेक शतकांदरम्यान वर्झाव्याचा वेगाने विकास झाला व पोलिश कला व संस्कृतीचे वॉर्सा माहेरघर बनले. इ.स. १७९५ साली वॉर्साप्रशियाच्या राजतंत्रात विलीन करण्यात आले; परंतु इ.स. १८०६ सालीनेपोलियनच्या सैन्याने वॉर्साची मुक्तता केली व त्यानंतरच्या नवनिर्मित पोलंड देशाची राजधानी येथेच राहिली.
दुसऱ्या महायुद्धाच्या सुरुवातीसनाझी जर्मनीने इ.स. १९३९ साली पोलंडवर कब्जा मिळवला व पोलिशज्यूंनां डांबून ठेवण्यासाठी वॉर्सा येथे पूर्व युरोपातील सर्वात मोठीछळछावणी उघडली. सुमारे चार लाख ज्यू केवळ ३.४ चौरस किमी इतक्या जागेत कोंबून ठेवले गेले होते. ह्यांपैकी अनेक ज्यूहत्यासत्रामध्ये मारले गेले. जुलै, इ.स. १९४४ मध्ये भूमिगत झालेल्या पोलिश सेनेने नाझी जर्मनीविरुद्ध बंड पुकारले व तेव्हा झालेल्या ६३ दिवसांच्या लढाईमध्ये वॉर्सातील १.५ ते २ लाख नागरिक मृत्युमुखी पडले. ह्या बंडामुळे खवळलेल्याॲडॉल्फ हिटलरने संपूर्ण वॉर्सा शहर जमीनदोस्त करण्याचा व संग्रहालयांमधील वस्तू जर्मनीमध्ये हलवण्याचा आदेश दिला. त्यानुसार जर्मन सैन्याने शिस्तबद्धरीत्या येथील सर्व इमारती पाडल्या किंवा जाळून टाकल्या. ह्या विध्वंसादरम्यान तत्कालीन शहराचा ८५ टक्के नष्ट झाला.
युद्ध संपल्यानंतर पोलंडमधील साम्यवादी राजवटीने वॉर्सा शहर पुन्हा उभे केले व अनेक ऐतिहासिक वास्तूंची पुनर्बांधणी केली. इ.स. १९८० साली वॉर्साच्या ऐतिहासिक नगरकेंद्रालायुनेस्कोच्याजागतिक वारसा स्थान यादीत स्थान मिळाले. इ.स. २००४ साली पोलंडयुरोपियन संघात सामील झाल्यानंतर वॉर्सा झपाट्याने विकसत आहे.
वॉर्सा हीमाझॉव्येत्स्की प्रांतामधील एक काउंटी असून ती एकूण १८ जिल्ह्यांमध्ये विभागली गेली आहे. वॉर्साचेस्थापत्य ऐतिहासिक गॉथिक ढंगाचे होते. त्यापैकी बऱ्याचशा वास्तू दुसऱ्या महायुद्धात उद्ध्वस्त करण्यात आल्या. युद्धोत्तर काळात अनेक जुन्या इमारती पुन्हा बांधण्यात आल्या, तर काही इमारती आधुनिक स्थापत्यात बांधल्या गेल्या. त्यामुळे येथे आज ऐतिहासिक व आधुनिक अश्या दोन्ही ढंगांच्या इमारती आढळतात. येथील स्थापत्यकलेची तुलना काही वेळापॅरिससोबत केली जाते.
पोलिश अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या वॉर्सात अनेक शासकीय संस्था तसेच खासगी कंपन्यांची कार्यालये आहेत. पोलंडचे १२ % उत्पन्न वॉर्सातून उपजते व आंतरराष्ट्रीय गुंतवणुकीबाबत वॉर्सा मध्य युरोपात अव्वल स्थानावर आहे. इ.स. २००८ साली येथीलवार्षिक दरडोई उत्पन्न सुमारे २३,०००युरो होते.[२] येथील बेरोजगारी केवळ ३ टक्के आहे.
एक मोठे जागतिक शहर असलेले वॉर्सा इ.स. २००८ साली जगातील ३५वे महागडे शहर होते.[३]मास्टरकार्ड कंपनीने बनवलेल्या विकसनशील बाजारांच्या जागतिक यादीमध्ये वॉर्साचा ६५मध्ये ८वा क्रमांक आहे.
ऐतिहासिक काळापासून पोलंड तसेच मध्य वपूर्व युरोपामधून स्थलांतर करणाऱ्या लोकांचे वॉर्सा हे आकर्षण राहिले आहे.पोलिश वंशाच्या लोकांसोबत येथे अनेक शतकेज्यू लोक मोठ्या संख्येने स्थायिक झाले आहेत. इ.स.च्या १९व्या शतकाच्या अखेरीस वॉर्सातले ३४ % नागरिक ज्यू वंशाचे होते.दुसऱ्या महायुद्धादरम्यान वॉर्सात मोठ्या प्रमाणावर नरसंहार घडला. युद्धपूर्व काळात इ.स. १९३९ साली १३ लाख लोकसंख्या असलेल्या वॉर्सात इ.स. १९४५ साली केवळ ४.२ लाख लोक उरले होते.
सध्या (इ.स. २०१५) येथील लोकसंख्या १७,१६,८५५ इतकी आहे.
गेल्या काही दशकांपासून वॉर्सातील वाहतूक सुविधा वेगाने सुधारत आहेत. येथे अनेक नवे रस्ते, महामार्ग, उड्डाणपूल बांधले जात आहेत. नागरी वाहतुकीसाठी अनेक बसमार्ग, तसेचट्राम व मेट्रो रेल्वेसेवा उपलब्ध आहेत. इ.स. १९९५ साली बांधण्यात आलेली वॉर्सा मेट्रो २३.१ कि.मी. लांबीच्या मार्गांवर धावते व रोज सुमारे ५.५ लाख प्रवासी वाहून नेते. देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय वाहतुकीसाठीरेल्वे व विमानसेवा उपलब्ध आहेत.
वॉर्सा चोपिन विमानतळ हा पोलंडमधील सर्वात मोठा व वर्दळीचा विमानतळ वॉर्सा महानगरामध्ये स्थित आहे.एल.ओ.टी. पोलिश एरलाइन्स ह्या पोलंडच्या राष्ट्रीयविमान वाहतूक कंपनीचे मुख्यालय व वाहतूकतळ येथेच आहे. ह्या विमानतळाद्वारे वॉर्सा युरोप व जगातील बहुतेक सर्व प्रमुख शहरांसोबत जोडले गेले आहे.
फुटबॉल हा वॉर्सातील सर्वांत लोकप्रिय खेळ आहे. लेगिया वॉर्सा व पोलोनिया वॉर्सा हे पोलिश फुटबॉल लीगमधील दोन लोकप्रिय संघ येथेच स्थित आहेत.युएफा यूरो २०१२ स्पर्धेचा पहिला व इतर अनेक सामने वर्झाव्यातल्या ५६,००० आसनक्षमतेच्यानॅशनल स्टेडियममध्ये खेळवले गेले.
कला व विज्ञानाचे प्रासाद ही वॉर्सातील सर्वात उंच इमारत आहे.
दुसऱ्या महायुद्धादरम्यान घडलेल्या विध्वंसामुळे वॉर्साच्यि कलाजीवनाला मोठा तडा गेला. येथील अनेक ऐतिहासिक संग्रहालये जमीनदोस्त केली गेली व त्यांमधील दुर्मिळ वस्तू लुप्त झाल्या. परंतु आजही येथे काही लोकप्रिय संग्रहालये अस्तित्वात आहेत. तसेच अनेक संगीत परिषदा, तसेच नाटके वॉर्सात भरवली जातात. इ.स. २०१६ सालच्यायुरोपियन सांस्कृतिक राजधानी किताबासाठी वॉर्सा एक स्पर्धक होता.
पोलंडमधील सर्वोत्तम शैक्षणिक संस्थांपैकी अनेक संस्था वॉर्सात आहेत. चार मोठीविद्यापीठे व ६१ उच्चशिक्षण संस्था येथे असून त्यात एकूण ५ लाख विद्यार्थी शिकतात. इ.स. १८१६ साली स्थापलेलेवॉर्सा विद्यापीठ हे पोलंडमधील सर्वात जुने, सर्वात मोठे व सर्वोत्तम श्रेणीचे विद्यापीठ आहे. तसेच वॉर्सा स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, फ्रेदरिक शोपें संगीत संस्था, वॉर्सा वैद्यकीय विद्यापीठ, वॉर्सा तांत्रिक विद्यापीठ, इत्यादी अनेक नावाजलेल्या वयुरोपातील सर्वोत्कृष्ट शैक्षणिक संस्था वॉर्सात आहेत.
या लेखाचा/विभागाचा सध्याचा मजकूर पुढील परभाषेत आहे :[[अनोळखी भाषा संकेत]] भाषेतूनमराठी भाषेतअनुवाद करण्यास आपला सहयोग हवा आहे.ऑनलाइन शब्दकोश आणि इतर साहाय्यासाठीभाषांतर प्रकल्पास भेट द्या.
^"Berlin's international city relations". Berlin Mayor's Office. 2013-05-10 रोजीमूळ पान पासून संग्रहित.1 July 2009 रोजी पाहिले.Berlin and Warsaw’s agreement on friendship and cooperation and a corresponding supporting program was signed in Berlin on 12 August 1991.
^"Twin Towns". www.amazingdusseldorf.com. 2014-10-17 रोजीमूळ पान पासून संग्रहित.29 October 2009 रोजी पाहिले.
^"Tel Aviv sister cities" (Hebrew भाषेत). Tel Aviv-Yafo Municipality. 2009-02-14 रोजीमूळ पान पासून संग्रहित.14 July 2009 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)