रशिया किंवारशियन फेडरेशन हा पूर्व युरोप आणि उत्तर आशियामध्ये पसरलेला देश आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने हा जगातील सर्वात मोठा देश आहे, जो अकरा टाइम झोनमध्ये पसरलेला आहे आणि चौदा देशांसह जमिनीच्या सीमा सामायिक करतो. हा जगातील नववा सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश आहे आणि युरोपमधील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश आहे. असे असले तरी रशियाचीलोकसंख्या अतिशय कमी म्हणजे फक्त १४,२९,०५,२०० एवढी आहे. ही लोकसंख्यासुद्धा देशाच्यापश्चिम भागातच एकवटली आहे. रशिया हा एक दशलक्षाहून अधिक रहिवासी असलेल्या १६ लोकसंख्येच्या केंद्रांसह एक अत्यंत शहरी देश आहे.मॅास्को ही रशियाचीराजधानी व सर्वात मोठेशहर आहे. सेंट पीटर्सबर्ग हे रशियाचे दुसरे सर्वात मोठे शहर आणि त्याची सांस्कृतिक राजधानी आहे.रशियन रूबल हे रशियाचेचलन आहे.ख्रिश्चन वनिधर्मी हे येथील प्रमुखधर्म आहेत. दुसऱ्या महायुद्धापर्यंत रशिया ही एकमहासत्ता होती, त्यानंतर रशियाची पीछेहाट झाली.
रशिया हालेख अपूर्ण आहे आणि पूर्ण करण्यास आपण हातभार लावू शकता.हा लेख संपादित करण्यासाठीयेथे टिचकी द्या. 'विकिपीडिया' मध्ये अपूर्ण लेख संपादित करण्यासाठीमदतीचा लेख येथे उपलब्ध आहे.
इ.स. १७२१ साली,पीटर द ग्रेटच्या अधिपत्याखाली रशियन साम्राज्य उदयास आले. इ.स. १६८२ ते १७२५ या काळात पीटर रशियावर राज्य करत होता. त्यानेउत्तरेकडच्या महान युद्धातस्वीडिश साम्राज्याचा पराभव केला वस्वीडनकडील प्रदेश स्वतःच्या ताब्यात घेतले. हे प्रदेशबाल्टिक समुद्राला लागून असल्याने रशियाला समुद्रातून व्यापार करणे शक्य झाले. बाल्टिक समुद्राला लागूनच पीटर द ग्रेटनेसेंट पीटर्सबर्ग ही राजधानी उभारली. पीटर द ग्रेटची मुलगीएलिझाबेथ ही पीटरनंतर गादीवर बसली. तिच्या कारकिर्दीत रशियानेसात वर्षीय युद्धात भाग घेतला, व पूर्व प्रशिया जिंकून घेतले. परंतु एलिझाबेथच्या मृत्यूनंतरतिसरा प्योत्र याने हे सर्व विभागप्रशियाच्या ताब्यात दिले. कॅथेरिन दुसरी किंवा "महान कॅथेरिन" हिने रशियावर इ.स. १७६२-९६ या कालावधीत राज्य केले. हिचा कालखंड रशियाच्या प्रबोधनाचा कालखंड म्हणून ओळखला जातो.
रशिया हा जगातीलक्षेत्रफळानुसार सर्वांत मोठा देश आहे. रशियाचे एकूण क्षेत्रफळ १,७०,७५,४०० चौ.किमी. आहे. रशियात २३जागतिक वारसा स्थळे व ४० राष्ट्रीय उद्याने आहेत.
रशियातील रेल्वे वाहतूक संपूर्णपणे सरकारने चालविलेल्यारशियन रेल्वे मार्फत होते. रशियात एकूण ८५,००० कि.मी.चे रेल्वेमार्ग आहेत. २००६ साली रशियात ९,३३,००० कि.मी. रस्ते होते. यातील ७,५५,००० कि.मी. रस्ते पक्के होते.
टीपा: (१) देशाचा काही भाग युरोपबाहेर मात्र युरोपला लागून; (२) देश संपूर्णतः युरोपबाहेर मात्र युरोपशी राजकीय आणि सामाजिक संबंध; (४) स्वायत्त संस्थाने (Principalities). (५) स्वातंत्र्य घोषित मात्र आंतरराष्ट्रीय समुदायाकडून देश म्हणून मान्यता नाही.