भूमध्य समुद्राच्या मधोमध असलेल्या स्थानामुळे माल्टावर ऐतिहासिक काळापासून अनेक महासत्तांचे वर्चस्व राहिले आहे. इ.स.पूर्व ३३२ मध्ये माल्टाकार्थेजच्या अधिपत्याखाली आला. प्युनिकच्यापहिल्या वदुसऱ्या युद्धांमध्ये माल्टी लोकांनीरोमनांची बाजू घेतली व लवकरच माल्टारोमन साम्राज्याच्या प्रगत भाग बनले. इ.स.च्या ४थ्या शतकामध्ये रोमन साम्राज्याची फाळणी झाल्यानंतर माल्टावरबायझेंटाईन साम्राज्याचे अधिपत्य आले.[५] ८व्या व ९व्या शतकामध्येसिसिली व माल्टाच्या अधिपत्यावरून अनेकमुस्लिम-बायझेंटाईन युद्धे झाली व मुस्लिमांनी माल्टावर कब्जा मिळवून तेथील सर्व सुविधा नष्ट केल्या ज्यामुळे माल्टा बेट लोकवस्तीसाठी अयोग्य बनले. परंतु इ.स. १००४८मध्ये मुस्लिमांनी माल्टामध्ये पुन्हा वसाहती निर्माण केल्या. ह्याच काळातअरबीपासून माल्टी भाषेचा उगम झाला.[६] इ.स. १०९१ मध्येख्रिश्चन धर्मीयनॉर्मन लोकांनी माल्टावर ताबा मिळवला व लवकरच माल्टासिसिलीच्या राजतंत्राचा भाग बनले. येथेरोमन कॅथलिक धर्म मोठ्या प्रमाणावर वाढीस लागला. माल्टाचे मोक्याचे स्थान लक्षात घेता येथे प्रचंड लष्करी सुविधा निर्माण केल्या गेल्या. १२व्या शतकात माल्टापवित्र रोमन साम्राज्यामध्ये विलिन केले गेले वदुसऱ्या फ्रेडरिकने येथील सर्व मुस्लिम धर्मीय रहिवाशांची हकालपट्टी केली.[७]
पुढील अनेक शतके युरोपातील विविध घराण्यांच्या ताब्याखाली राहिल्यानंतर इ.स. १७९८ मध्येनेपोलियनने माल्टा काबीज केले. नेपोलियननेइजिप्तकडे जाताजाता येथे तैनात केलेल्या मोठ्या फ्रेंच सैन्याने माल्टाची लुटालूट सुरू केली ज्यामुळे स्थानिक माल्टी लोक खवळून उठले व त्यांनी फ्रेंचांना येथून हाकलून लावले.ब्रिटिश साम्राज्याने माल्टींना शस्त्रे व दारूगोळा पुरवला. इ.स. १८०० मध्ये फ्रेंच सेनापतीने शरणागती पत्कारली.[८] माल्टी लोकांनी माल्टावर ब्रिटिशांचे अधिपत्य मंजूर केले व माल्टा ब्रिटिश साम्राज्याचा भाग बनला. १८६९ मध्येसुएझ कालवा खुला झाल्यानंतर भूमध्य समुद्रातील जलवाहतूकीसाठी माल्टा हा महत्त्वाचा थांबा बनला. ब्रिटनहूनभारताकडे जाणारी जहाजे माल्टा येथे थांबत असत.दुसऱ्या महायुद्धातअक्ष राष्ट्रांनी माल्टाला वेढा घतला व येथे प्रचंड बॉंबहल्ला चढवला परंतु ब्रिटिश आरमाराने त्यांना चोख उत्तर दिले व नोव्हेंबर १९४२ मध्ये इटली वनाझी जर्मनीचा येथे सपशेल पराभव झाला.
माल्टा हा भूमध्य समुद्रातील एकद्वीपसमूह असून माल्टा,गोझो वकोमिनो ह्या तीन बेटांवर वस्ती आहे तर इतर बेटे निर्मनुष्य आहेत.
माल्टाची बेटे माल्टाच्या पठारावरील उंच प्रदेश आहे. माल्टाचे पठार प्रागैतिहासिक काळातसिचिल्या आणिआफ्रिकेच्या मधील चिंचोळी पट्टी होती. समुद्रपातळी वाढल्यावर हे पठार पाण्याखाली गेले आणि माल्टा, सिचिल्या,इटली आणि आफ्रिका एकमेकांपासून वेगळे झाले..[११] हे पठार आफ्रिकेच्या भूस्तराचा भाग मानला जाते.[१२][१३] माल्टाला अनेक शतके आफ्रिका खंडाचा भाग समजले जात असे.[१४] माल्टाच्या आसपासच्या समुद्रतळावर अनेक प्राचीन अवशेष आहेत.[१५]
माल्टाच्या किनाऱ्यावर अनेक खाड्या आणि नाळ्या आहेत. तेथे नैसर्गिक बंदरे व नांगरण्या तयार झाल्या आहेत. बेटाचा भूभाग बुटक्या टेकड्या आणि सपाट मैदानांचा आहे. टा द्मेयरेक हा माल्टातील सर्वोच्च बिंदी २५३ मी उंचीवर आहे
माल्टा बेटावर एकही कायमस्वरुपी नदी नाही. सतत मोठ्या प्रमाणात पाउस पडल्यावर काही नाल्यांमध्ये पूर व पाणी असते परंतु ते लवकरच आटते. तरीहीरास इर-राहेब जवळीलबाह्रिया येथे, सान मार्टिन मधीलल-इमताहलेब आणिगोझो बेटावरील लुंझ्याता खोऱ्यात काही ठिकाणी बारमाही झरे आढळतात.
माल्टा देशातील दोन प्रमुख शहरी भाग राजधानीव्हॅलेटा शहर आणिगोझो बेटावर आहेत. या शहरी भागांत सुमारे ४,००,००० लोक राहतात.[१६][१७] यांतील २,०५,७६८ लोक व्हॅलेटामध्ये राहतात.[१८][१९][२०]संयुक्त राष्ट्रांच्या एक पाहणीनुसार माल्टाचा ९५% प्रदेश शहरी आहे आणि हा आकडा दरवर्षी वाढतो आहे.[२१][२२]
संपूर्ण माल्टा देशात फक्त ४.६२ किमी नैसर्गिक जंगल आहे. ही झाडे तुलनेने खुरटी असून यांची उंची साधारण २-५ मीटर असते. येथे विलो, पॉपलर, ऑलिव्ह, ओक, अलेप्पो पाइन, निलगिरी, अकॅशिया आणि खजूर, ताड, इ. झाडे आढळतात.[२३][२४] यांशिवाय फक्त माल्टामध्ये सापडणाऱ्याही काही उपप्रजाती आहेत.[२५] याभूमध्य समुद्रीय हवामानाला माफक अशा असतात. यांच्यातविड्नेट इल-बहार (माल्टाचे राष्ट्रीय फूल),सेम्प्रेविव्हा टा'माल्टा,झिगलँड ट'ग्वादेश आणिगिझी टा'माल्टा यांचा समावेश आहे.
माल्टामधील वनसंपदा शहरीकरण आणि बाहेरून आलेल्या प्रजाती यांच्यामुळे धोक्यात आहेत.[२६]
माल्टाचे हवामानभूमध्य समुद्रीय प्रकारचे आहे व येथील हिवाळे उबदार तर उन्हाळे सौम्य असतात. येथील वार्षिक सरासरी तापमान दिवसा २३ °से (७३ °फॅ) तर रात्री १६ °से (६१ °फॅ) असते. एका परीक्षणानुसार माल्टामधील हवामान जगात सर्वोत्तम मानले गेले आहे.[२७]
माल्टा बेटाच्या मध्य भागात; 1985– साठी हवामान तपशील
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या व्याख्येनुसार माल्टा जगातील ३६विकसित देशांपैकी एक असून येथील राहणीमान उच्च दर्जाचे आहे. येथे अनेक नैसर्गिकबंदरे आहेत ज्यामुळे मालवाहतूकीचे माल्टा हे जगातील प्रमुख केंद्रांपैकी एक आहे. बँकिंग व पर्यटन हे येथील प्रमुख उद्योग आहेत. माल्टाला दरवर्षी सुमारे १६ लाख पर्यटक भेट देतात. येथील वार्षिक दरडोई उत्पन्न €२१,५०० आहे जे युरोपियन संघाच्या सरासरीच्या ८६ टक्के आहे.
माल्टा लोकप्रिय पर्यटनकेंद्र आहे. येथे दरवर्षी सुमारे १६ लाख पर्यटक भेट देतात.[३२] ही संख्या माल्टामध्ये राहणाऱ्या एकूण रहिवाशांच्या तिप्पट आहे. २०१९मध्ये येथे २१ लाख पर्यटकांनी भेट दिली होती.[३३] माल्टामधील पर्यटनाच्या पायाभूत सुविधांमध्ये केल्या काही वर्षांत मोठी सुधारणा झाली आहे. २०२४ च्या सुमारास येथे अनेक मोठी होटेले झालेली आहेत. यामुळे स्थानिक घरकुले नाहीशी होत आहेत आणि अतिविकास होत असल्याचेही दिसून येते.
२०१५नंतर माल्टामध्ये आरोग्यपर्यटनही वाढले आहे.[३४] येथे अनेक आधुनिक आरोग्य सुविधा आहेत परंतु त्यांना आंतरराष्ट्रीय मान्यता नाही. येथेब्रिटनमधून मोठ्या संख्येने आरोग्यप्रवासी येतात.[३५]
पर्यटन उद्योग देशाच्या एकूण उत्पादनात ११.६% भर घालतो.[३६]
माल्टा संसदीय प्रजासत्ताक आहे. येथीलसंसदेमध्येलोकप्रतिनिधीसभेचे नेतृत्त्वपंतप्रधान करतात.माल्टाचे राष्ट्राध्यक्ष येथील राष्ट्रप्रमुख असतात. त्यांची नेमणूक पाच वर्षांसाठी संसद करते.१३ मतदारसंघांमधून प्रत्येकी ५ असे ६५ प्रतिनिधी संसदेत ५ वर्षांसाठी सार्वत्रिक मतदानाने निवडून जातात. प्रत्येक मतदार एकापेक्षा जास्त उमेदवारांना अनुक्रमाने मत देतो. जर पहिल्या क्रमांकाचा उमेदवार जिंकला नाही तर पुढील क्रमांकाच्या उमेदवारास ते मत दिले जाते. संसदसदस्यांनी अविश्वासाचा प्रस्ताव मंजूर केल्यास पंतप्रधानांच्या सल्ल्याने राष्ट्राध्यक्ष संसद विसर्जित करून नवीन निवडणुका घेतल्या जातात. १९६०-९५ दरम्यानच्या निवडणुकांमध्ये माल्टातील मतदानप्रमाण जगातील दुसऱ्या क्रमांकाचे होते.[३७]
माल्टामध्ये दोन मुख्य राजकीय पक्ष आहेत -- मजूर पक्ष तथापार्तित लाबुरिस्ता आणि राष्ट्रवादी पक्ष तथापार्तित नॅझ्योनालिस्ता. मजूर पक्ष २०१३पासून सत्तेवर आहे. तेव्हापासून भ्रष्टाचार, काळा पैसा आणि शासनातील ढिसाळपणा वाढल्याचा काही लोकांचा दावा आहे.[३९] सध्याचे पंतप्रधान अबेला १३ जानेवारी, २०२० पासून सत्तेवर आहेत. देशात इतर अनेक छोटे पक्ष आहेत पण त्यांना संसदेत एकही जागा मिळालेली नाही.
माल्टामध्ये १९९३पासून स्थानिक स्वराज्य संस्थांद्वारे प्रशासन चालवले जाते.[४०] युरोपीय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या धर्तीवर असलेल्या या६ समित्या राष्ट्रीय प्रशासन आणि शहर किंवा गावातील प्रशासनांच्या मध्ये असतात.[४१]
माल्टामध्येओटोकार आणिकिंग लाँग बस सार्वजनिक वाहतूकीसाठी वापरल्या जातात
माल्टात रस्त्यावरील वाहतूकभारत वयुनायटेड किंग्डमप्रमाणे रस्त्याच्या डाव्या बाजूने होते. युरोपमधील इतर देशांपेक्षा हे वेगळे आहे. माल्टामधील दरमाणशी कारचे प्रमाण खूप मोठे आहे. देशात एकूण २,२५४ किमी लांबीचे रस्ते आहेत. यातील ८७.५% पक्के आहेत.[४२]
माल्टातील बस (कारोझ्झ ताल-लिन्या) या सार्वजनिक वाहतूकीचे प्रमुख साधन आहे. या बस १९०५पासून माल्टाच्या रस्त्यांवर धावत आहेत. तेथील जुन्या बस २०११पर्यंत सेवेत होत्या. या पर्यटकांसाठी मोठे आकर्षण होत्या. आजही माल्टातील आणि माल्टाबद्दलच्या जाहिरातींमध्ये या जुन्या बसचीच चित्रे वापरली जातात..[४३] या जुन्या बस खाजगी चालकांच्या मालकीच्या असत आणि ते ही सेवा स्वतंत्रपणे पुरवत असत. २०११मध्ये माल्टा शासनाने हे तंत्र बदलून एकाच कंपनीला संपूर्ण देशातील बससेवा चालविण्याचे कंत्राट देऊ केले.[४४] हे कंत्राटअरिवा माल्टा या कंपनीने जिंकले. अरिवा माल्टाने किंग लाँग प्रकारच्या बस वापरून सेवा पुरवणे सुरू केले. याशिवाय ६१ अधिक क्षमतेच्या बस आणि २ व्हॅलेटा शहरातील गल्ल्यांमधून वापरण्यासाठीच्या छोट्या बसही वापरल्या.
अरिवा माल्टाला हा कारभार सांभाळता आला नाही आणि १ जानेवारी, २०१४ रोजी या कंपनीने दिवाळे काढले. माल्टा शासनाने अरिवा माल्टाचे राष्ट्रीयीकरण केले आणि ही सेवामाल्टा सार्वजनिक वाहतूक नावाने चालू ठेवली.[४५][४६] ऑक्टोबर २०१४मध्ये शासनाने ही सेवाआउतोबुस उर्बानोस दे लेऑन या कंपनीकडे सोपवली.[४७] ऑक्टोबर २०२२ पासून ही सेवा माल्टाच्या नागरिकांनी आणि कायमी रहिवाशांना मोफत उपलब्ध आहे.[४८]
२०२१मध्ये माल्टा शासनाने ६.२ अब्ज युरो खर्चूनमाल्टा मेट्रो बांधण्याची योजना सुरू केली आहे.[४९]
माल्टाच्या मुख्य बेटावर तीन नैसर्गिक बंदरे आहेत --
ग्रँड हार्बर तथापोर्ट इल-कबीर --व्हॅलेटाच्या पूर्वेस असलेले हे बंदररोमन साम्राज्यापासून आहे. येथे अनेक धक्के आणि प्रवासी टर्मिन आहेत. क्रुझ जहाजांसाठीचा मोठा धक्काही येथे आहे. ग्रँड हार्बरपासून सिचिल्यामधील पोझ्झालो आणि कतानियाला फेरीसेवा उपलब्ध आहे.
२०२१ च्या जनगणनेनुसार माल्टाची एकूण लोकसंख्या ५,१९,५६२ होती. यांतील माल्टामध्ये जन्म झालेले ३,८६,२८० व्यक्ती होत्या[५१] इतर देशांमध्ये जन्मलेल्यांपैकीयुनायटेड किंग्डमचे १५,०८२,इटली १३,३६१,भारत ७,९४६,फिलिपिन्स ७,७८४ आणिसर्बियाचे ५,९३५ हे गट प्रमुख आहेत.
माल्टामध्ये जन्म न झालेल्या लोकांच्या वांशिक वर्गवारीत ५८.१% कॉकेशियन, २२.२% आशियाई, ६.३% अरब, ४.५% हिस्पॅनिक होते.[५२]
माल्टी भाषा येथील दोन अधिकृत भाषांपैकी एक आहे.इंग्लिश ही दुसरी अधिकृत भाषा आहे. माल्टामधील कायदे माल्टी आणि इंग्लिश अशा दोन्ही भाषांमध्ये लिहिले जातात.संविधानाच्या ७४व्या कलमानुसार दोन्हीमध्ये तफावत आढळला तर माल्टी भाषेतील कायदा प्रमाण मानला जातो. येथील लोकमाल्टी इंग्लिश ही बोलीभाषा वापरतात.
^Protokol Lokali u Reġjonali(PDF) (माल्टिज् भाषेत). Dipartiment tal-Informazzjoni. pp. 5–6. 17 June 2012 रोजीमूळ पान(PDF) पासून संग्रहित.2 April 2015 रोजी पाहिले.
टीपा: (१) देशाचा काही भाग युरोपबाहेर मात्र युरोपला लागून; (२) देश संपूर्णतः युरोपबाहेर मात्र युरोपशी राजकीय आणि सामाजिक संबंध; (४) स्वायत्त संस्थाने (Principalities). (५) स्वातंत्र्य घोषित मात्र आंतरराष्ट्रीय समुदायाकडून देश म्हणून मान्यता नाही.