माद्रिद (स्पॅनिश:Madrid) हीस्पेन देशाची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे. माद्रिद शहरआयबेरियन द्वीपकल्पाच्या मध्य भागात मांझानारेझ नदीच्या काठावर वसले आहे. २०१४ साली माद्रिद शहराची लोकसंख्या सुमारे ३१.६५ लाख तर महानगर क्षेत्राची लोकसंख्या ६४.८९ लाख होती. माद्रिद हेलंडन वबर्लिन खालोखालयुरोपियन संघामधील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर तरलंडन वपॅरिस खालोखाल तिसऱ्या क्रमांकाचे मोठे महानगर आहे.
माद्रिद स्पेनचे आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक व शैक्षणिक केंद्र आहे. १९९२ साली माद्रिदयुरोपियन सांस्कृतिक राजधानी होती. युरोपामध्ये तिसऱ्या क्रमांकाची मोठी अर्थव्यवस्था असणारे माद्रिद सर्वच बाबतीत युरोपातील एक बलाढ्य स्थान वदक्षिण युरोपाचे आर्थिक केंद्र मानले जाते. २०१४ मधील एका सर्वेक्षणानुसार माद्रिद निवासासाठी जगातील १७व्या क्रमांकाचे सर्वोत्तम शहर होते.संयुक्त राष्ट्रांच्याविश्व पर्यटन संस्थेचे मुख्यालय माद्रिद येथे आहे.
प्रागैतिहासिक काळापासूनरोमन साम्राज्याचा भाग असलेले माद्रिद नवव्या शतकाच्या उत्तरार्धातउत्तर आफ्रिकेमधीलमुस्लिम योद्ध्यांच्या अधिपत्याखाली आले. परंतु इ.स. १०८५ सालीख्रिश्चन योद्ध्यांनी ह्या भूभागावर ताबा मिळवला व येथेख्रिश्चन धर्माचे अधिपत्य सुरू झाले. माद्रिदची वाढ होत गेली व १२०२ मध्ये कास्तिलचा अल्फोन्सो आठवा ह्याने माद्रिदला शहराचा दर्जा दिली. १५२० सालीपवित्र रोमन सम्राटपहिल्या कार्लोसच्या विरोधात चालू झालेल्या बंडामध्ये माद्रिदने सहभाग घेतला होता.
१५६१ साली माद्रिदची लोकसंख्या ३०,००० होती. ह्याच वर्षीदुसऱ्या फिलिपने आपले निवासस्थानवायादोलिदहून माद्रिदला हलवले. ह्यामुळे माद्रिद स्पॅनिश साम्राज्याचे राजकीय केंद्र बनले व माद्रिदची वाढ झपाट्याने होऊ लागली. १७व्या शतकामध्ये माद्रिदमध्येमिगेल सर्व्हान्तेस,दियेगो व्हेलाझ्केझ इत्यादी विख्यात कलाकार वास्तव्यास होते.तिसऱ्या कार्लोसच्या कार्यकाळात माद्रिदचा कायापालट करण्यात आला. १९३६ ते १९३९ दरम्यान चाललेल्यास्पॅनिश गृहयुद्धात माद्रिदची मोठ्या प्रमाणावर पडझड झाली होती. परंतुफ्रांसिस्को फ्रांकोच्या राजवटीमध्ये १९५९ ते १९७३ दरम्यान स्पेनमध्ये झालेल्या आर्थिक उत्कर्षादरम्यान माद्रिदची जलद गतीने प्रगती झाली.
सध्या (इ.स.२०१५) माद्रिद स्पेनमधील सर्वात श्रीमंत प्रदेश असून माद्रिद क्षेत्र स्पेनच्या ४७ टक्के आर्थिक उलाढालीसाठी कारणीभूत आहे. परंतु २०१० सालापासून स्पेनमध्ये सुरू असलेल्या आर्थिक मंदीमुळे माद्रिदची अर्थववस्था खालावली असून अनेक नवे विकास उपक्रम थांबवण्यात आले आहेत.