इ.स. पूर्व पंधराव्या शतकामधील उल्लेख सापडलेले बैरूत जगातील सर्वात प्राचीन शहरांपैकी एक आहे. सध्या बैरूत लेबेनॉनचे राजकीय, आर्थिक व सांस्कृतिक केंद्र असून २०१२ साली बैरूतची लोकसंख्या ३.६१ लाख तर महानगराची लोकसंख्या २० लाकांहून अधिक होती. बैरूत हे लेबेनॉनमधील सर्वात मोठे पर्यटनस्थळ असून येथील सौम्य हवामान व समुद्रकिनारे अनुभवायला येथे अनेक पर्यटक येतात. परंतु वारंवार होत असणाऱ्या युद्धांमुळे व अस्थिर राजकीय परिस्थितीमुळे बैरूतची अर्थव्यवस्था काहीशी कमकूवत बनली आहे.
बैरूत शहर एका नैसर्गिकद्वीपकल्पावर वसले असून त्याच्या पूर्वेकडून बैरूत नदी वाहते तर पश्चिमेलाभूमध्य समुद्र आहे. बैरूतइस्रायल-लेबेनॉन सीमेच्या ९४ किमी (५८ मैल) उत्तरेस स्थित आहे.
बैरूत–रफिक हरिरी आंतरराष्ट्रीय विमानतळ हा बैरूतमधील प्रमुखविमानतळ आहे. हा लेबेनॉनमधील सध्या चालू असलेला एकमेव विमानतळ असून २०१३ साली सुमारे ६२ लाख प्रवाशांनी येथून प्रवास केला. लेबेनॉनची जलवाहतूक बैरूतबंदर हे देशामधील सर्वात मोठे बंदर हाताळते.
^"Climate of Beirut" (Russian भाषेत). Weather and Climate (Погода и климат).October 8, 2014 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
^Cappelen, John; Jensen, Jens."Libanon - Beyrouth"(PDF).Climate Data for Selected Stations (1931-1960) (Danish भाषेत). Danish Meteorological Institute. p. 167. 2013-04-27 रोजीमूळ पान(PDF) पासून संग्रहित.2 March 2013 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)