बर्लिन जर्मनी देशाचीराजधानी घड्याळाच्या काट्याच्या दिशेने:शार्लटनबुर्ग राजवाडा ,फर्नसेहटुर्म बर्लिन ,राइशस्टाग ,बर्लिन कॅथेड्रल , राष्ट्रीय गॅलरी, पोट्सडामर प्लाट्झ वब्रांडेनबुर्ग फाटक ध्वज चिन्ह
बर्लिनचे जर्मनीमधील स्थान गुणक:52°30′2″N 13°23′56″E / 52.50056°N 13.39889°E /52.50056; 13.39889
देश जर्मनी राज्य बर्लिन स्थापना वर्ष अं. इ.स. ११९२ महापौर क्लाउस वोवेराइट क्षेत्रफळ ८९१.८ चौ. किमी (३४४.३ चौ. मैल) समुद्रसपाटीपासुन उंची ११२ फूट (३४ मी) लोकसंख्या (३० एप्रिल २०११[ १] ) - शहर ३४,७१,७५६ -घनता ३,८६९.४ /चौ. किमी (१०,०२२ /चौ. मैल) - महानगर ४४,२९,८४७ प्रमाणवेळ मध्य युरोपीय प्रमाणवेळ berlin.de
बर्लिन (जर्मन :Berlin ) हीजर्मनी देशाची राजधानी व१६ राज्यांपैकी एक राज्य आहे. सुमारे ३४.७ लाख लोकसंख्या असलेले बर्लिन हे जर्मनीमधील सर्वात मोठे शहर आहे.[ १] बर्लिन शहर जर्मनीच्या ईशान्य भागात वसले असून ते बर्लिन-ब्रांडेनबुर्ग ह्यायुरोपातील सर्वात मोठ्या महानगर क्षेत्राचे केंद्र आहे.
१२व्या शतकाच्या सुमारास स्थापन झालेल्या बर्लिनला युरोपाच्या इतिहासात विशेष स्थान आहे. आजवर बर्लिन हीप्रशियाच्या राजंत्राची (१७०१ - १९१८),जर्मन साम्राज्याची (१८७१ - १९१८),वाइमार प्रजासत्ताकाची (१९१९ - १९३३),नाझी जर्मनीची (१९३३ - १९४५) व आजच्या जर्मनी देशाची (१९९० - चालू) राजधानी राहिलेली आहे.दुसऱ्या महायुद्धामध्ये नाझी जर्मनीचा पराभव झाल्यानंतर बर्लिन शहराचे दोन तुकडे करण्यात आले.पूर्व बर्लिन हेपूर्व जर्मनीच्या राजधानीचे शहर तरपश्चिम बर्लिन हेपश्चिम जर्मनीच्या अधिपत्याखालील शहर हे दोन तुकडेबर्लिनच्या भिंतीने वेगळे करण्यात आले. १९९० साली जर्मनीच्या एकत्रीकरणानंतर बर्लिनची भिंत पाडून टाकण्यात आली व बर्लिन शहर पुन्हा एकदा एकसंध झाले.
एक जागतिक शहर असलेले बर्लिन हे राजकीय, शैक्षणिक व सांस्कृतिक दृष्ट्या युरोपामधील एक प्रमुख शहर आहे.
दुसऱ्या महायुद्धामध्ये बरेचसे बेचिराख झालेले शहर १९५० व १९६० च्या दशकांमध्ये नव्याने बांधण्यात आले. ऐतिहासिक काळापासून अनेक राजवटींचे मुख्य शहर असल्यामुळे बर्लिनमध्ये विविध कलाप्रकाराच्या इमारती आहेत.
बाराव्या शतकामध्ये स्थापन झालेले बर्लिन हेहान्से ह्या संघामधील एक प्रमुख शहर होते. इ.स. १७०१ मध्येप्रशियाच्या राजतंत्राच्या निर्माणानंतर बर्लिन हे राजधानीचे शहर बनले.
बर्लिन शहरजर्मनीच्या ईशान्या भागातपोलंड देशाच्या सीमेच्या ८५ किमी पश्चिमेलास्प्री नदीच्या काठांवर वसले आहे.ब्रांडेनबुर्ग राज्याने बर्लिनला सर्व बाजूंनी वेढून टाकले आहे.
बर्लिन शहरामधीलहवामान सौम्य व आर्द्र स्वरूपाचे आहे.
बर्लिन साठी हवामान तपशील महिना जाने फेब्रु मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें वर्ष विक्रमी कमाल °से (°फॅ) 15.0 (59) 17.0 (62.6) 23.0 (73.4) 27.0 (80.6) 33.0 (91.4) 36.0 (96.8) 37.8 (100) 35.0 (95) 32.0 (89.6) 25.0 (77) 18.0 (64.4) 15.0 (59) 37.8 (100) सरासरी कमाल °से (°फॅ) 2.9 (37.2) 4.2 (39.6) 8.5 (47.3) 13.2 (55.8) 18.9 (66) 21.6 (70.9) 23.7 (74.7) 23.6 (74.5) 18.8 (65.8) 13.4 (56.1) 7.1 (44.8) 4.4 (39.9) 13.4 (56.1) दैनंदिन °से (°फॅ) 0.5 (32.9) 1.4 (34.5) 4.9 (40.8) 8.7 (47.7) 14.0 (57.2) 17.0 (62.6) 19.0 (66.2) 18.9 (66) 14.7 (58.5) 9.9 (49.8) 4.7 (40.5) 2.0 (35.6) 9.6 (49.3) सरासरी किमान °से (°फॅ) −1.9 (28.6) −1.5 (29.3) 1.3 (34.3) 4.2 (39.6) 9.0 (48.2) 12.3 (54.1) 14.3 (57.7) 14.1 (57.4) 10.6 (51.1) 6.4 (43.5) 2.2 (36) −0.4 (31.3) 5.9 (42.6) विक्रमी किमान °से (°फॅ) −21.0 (−5.8) −14.0 (6.8) −13.0 (8.6) −4.0 (24.8) −1.0 (30.2) 4.0 (39.2) 7.0 (44.6) 7.0 (44.6) 0.0 (32) −7.0 (19.4) −9.0 (15.8) −17.0 (1.4) −21.0 (−5.8) सरासरी पर्जन्य मिमी (इंच) 42 (1.65) 33 (1.3) 41 (1.61) 37 (1.46) 54 (2.13) 69 (2.72) 56 (2.2) 58 (2.28) 45 (1.77) 37 (1.46) 44 (1.73) 55 (2.17) 571 (22.48) सरासरी पावसाळी दिवस 10.0 8.0 9.1 7.8 8.9 9.8 8.4 7.9 7.8 7.6 9.6 11.4 106.3 महिन्यामधीलसूर्यप्रकाशाचे तास 46.5 73.5 120.9 159.0 220.1 222.0 217.0 210.8 156.0 111.6 51.0 37.2 १,६२५.६ स्रोत #1: विश्व हवामान संस्था (संयुक्त राष्ट्रे )[ २] स्रोत #2: HKO[ ३]
बर्लिनमध्ये दोन मोठे विमानतळ आहेत.टेगेल विमानतळ शहराच्या सीमेत असूनशोनेफेल्ड विमानतळ शहराबाहेरब्रांडेनबुर्ग राज्यात आहे.लुफ्तांसा ,युरोविंग्ज आणिएर बर्लिन टेगेल विमानतळाचा तरजर्मनविंग्ज ,ईझीजेट आणिरायनएर या कंपन्या शोनेफेल्ड विमानतळाचा वापर करतात.
शोनेफेल्ड विमानतळाला लागूनबर्लिन ब्रांडेनबुर्ग विमानतळ हा नवीन विमानतळ २०१७ च्या शेवटापर्यंत बांधून तयार होईल. त्यानंतर टेगेल विमानतळ बंद करण्यात येईल.
डॉइच बाह्न आणिबर्लिनेर वेरकेरबिट्रीब बर्लिन महानगरात पाच प्रकारच्या सार्वजनिक वाहतूक प्रणाली चालवतात.[ ४]
प्रणाली स्थानके / मार्गिका / एकूण लांबी वार्षिक प्रवासी नोंदी एस-बाह्न १६६/१५/३२७ किमी ४१,७०,००,०००(२०१५) डॉइच बाह्न /जमिनीच्या वरून चालणारी द्रुतगती रेल्वे. उपनगरांतून स्थानके.यू-बाह्न १७३/१०/१४६ किमी ५०,७०,००,०००(२०१२) बीव्हीजी /२४ तास सुरू असणारी भुयारी रेल्वेट्रॅम ४०४/२२/१८९ किमी १८,१०,००,०००(२०१४) बीव्हीजी/शहराच्या पूर्व भागात बस ३,२२७/१५१/१,६२६ किमी ४०,५०,००,०००(२०१४) बीव्हीजी/शहरभर सगळीकडे सेवा/६२ रात्रीचे मार्ग फेरी ५ मार्गिका बीव्हीजी/इतर मार्गिकांवरील तिकिट येथे चालते
येथीलऑलिंपिक स्टेडियममध्ये १९३६ उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धा व२००६ फिफा विश्वचषक स्पर्धेमधील अंतिम सामना खेळवण्यात आले होते. १९३६ उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेचे बर्लिन हे यजमान शहर होते. तसेच२००६ फिफा विश्वचषक अंतिम सामना येथे खेळवला गेला होता.फुटबॉल हा येथील सर्वात लोकप्रिय खेळ असूनफुसबॉल-बुंडेसलीगामध्ये खेळणाराहेर्था बे.एस.से. हा बर्लिनमधील प्रमुख फुटबॉल क्लब आहे.
जगातील १७ शहरे बर्लिनची अधिकृतजुळी शहरे आहेत.[ ५]