फ्रान्स हालेख अपूर्ण आहे आणि पूर्ण करण्यास आपण हातभार लावू शकता.हा लेख संपादित करण्यासाठीयेथे टिचकी द्या. 'विकिपीडिया' मध्ये अपूर्ण लेख संपादित करण्यासाठीमदतीचा लेख येथे उपलब्ध आहे.
इतर युरोपियन देशांप्रमाणेसामंतशाहीचा उदय,विकास झाला.राजावरही सामंतशाहीचा प्रभाव होता. मध्ययुगाच्या शेवटी धर्मसुधारणा(प्रबोधनाच्या) चळवळीच्यावेळी सामंतशाहीचा अंत झाला.
या काळाच्या सुरुवातीला इ.स.१७८९ ते १७९९ या काळातफ्रेंच राज्यक्रांती झाली.फ्रान्सची अर्थव्यवस्था डबघाईला आली होती. राजाचौदाव्या लुईने जनप्रतिनिधीच्या दबावाखाली येऊन काही सुधारणा केल्या.त्याच्यानंतर चौदाव्या लुईचा पणतू असणाऱ्यापंधराव्या लुईला गादीवर बसवण्यात आले.त्याच्या चुकीच्या निर्णयांमुळे फ्रान्सचे लष्करी व राजकीय महत्त्व कमी झाले.सोळाव्या लुईच्या वेळी फ्रान्सच्या अर्थव्यवस्थेची स्थिती आणखी बिकट होत गेली.फ्रेंच जनतेचे त्यावेळेचे मुख्य अन्न असणाराब्रेडच महाग झाला होता.त्याविषयी दाद मागण्यास प्रजा गेली असता फ्रान्सच्या राणीने "ब्रेड महाग झाला असेल तरकेक खा" असे उत्तर दिल्यामुळे जनता संतप्त झाली.१४ जुलैइ.स. १७८९ रोजी पॅरिसच्याबॅस्तिये किल्ल्यावर हल्ला करून जनतेने फ्रेंच राज्यक्रांतीची सुरुवात केली.तिसऱ्या इस्टेटीकडून म्हणजे जनप्रतिनिधींकडूनटेनिस कोर्टावर शपथ घेण्यात आली.सोळाव्या लुईचा गिलोटीनवर म्हणजेच सुळावर शिरच्छेद करण्यात आला व त्याच्या कुटुंबाला तुरुंगात टाकण्यात आले.तीन वर्षांच्या काळात फ्रान्सवरील अनियंत्रित राजसत्ता जाऊन त्याठिकाणी लोकशाही आली.पुढील काही वर्षं राजकीय अस्थिरता राहिली.या राजकीय अस्थिरतेचा फायदा घेऊन सेनापतीनेपोलियन बोनापार्टने सत्ता हस्तगत केली व तो फ्रान्सचा सम्राट बनला.इ.स.१८२१ मध्येविषप्रयोगामुळे त्याचा मृत्यू झाला.व्होल्टेअर ,रुसो अशा विचारवंतांच्या प्रेरणेमुळे फ्रेंच राज्यक्रांती सुरू झाली होती.
फ्रान्सचे २७ प्रदेश आहेत, पैकी २२ प्रदेश सलग आहेत.कॉर्सिका बेट व चार इतर द्वीपसमूह उरलेले पाच प्रांत आहेत. हे २६ प्रांत १०० डिपार्टमेंटमध्ये (विभाग) विभागले आहेत. १०० डिपार्टमेंट ३४१ जिल्ह्यांमध्ये विभागले आहेत, जे ४,०३२कॅंटनांमध्ये विभागले जातात. सगळ्या कॅंटनांमध्ये मिळून ३६,६८० कम्यून आहेत. प्रत्येक कम्यून हे नगरपालिकेच्या स्वरूपाचे असतात.
टीपा: (१) देशाचा काही भाग युरोपबाहेर मात्र युरोपला लागून; (२) देश संपूर्णतः युरोपबाहेर मात्र युरोपशी राजकीय आणि सामाजिक संबंध; (४) स्वायत्त संस्थाने (Principalities). (५) स्वातंत्र्य घोषित मात्र आंतरराष्ट्रीय समुदायाकडून देश म्हणून मान्यता नाही.