फिरेंझे किंवाफ्लोरेन्स (इटालियन:Firenze,उच्चार) हीइटली देशाच्या मधीलतोस्कानाप्रदेशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. फिरेंझे शहराची लोकसंख्या सुमारे ३.७ लाख तर महानगर क्षेत्राची लोकसंख्या १५ लाख आहे.
ऐतिहासिक काळापासून फिरेंझे हे इटली वयुरोपामधील कला व संस्कृतीचे माहेरघर मानले गेले आहे. विशेषतःमध्ययुग वरानिसां काळांत चित्रकला, शिल्पकला व वास्तूशास्त्र ह्या विषयांमध्ये फ्लोरेन्सचे योगदान अमुल्य मानले जाते. सर्वानुमते रानिसांचा उगम फ्लोरेन्स येथेच झाला. मध्ययुगात व्यापार व अर्थकारणारे केंद्र असलेले फ्लोरेन्स हे त्या काळात जगातील सर्वात महत्त्वाच्या व श्रीमंत शहरांपैकी एक होते.[२][३] रानिसां दरम्यानच्याफ्लोरेन्सच्या प्रजासत्ताकाची फ्लोरेन्स ही राजधानी होती.
येथील ऐतिहासिक वास्तूंमुळे फ्लोरेन्स हे जगातील सर्वात सुंदर शहरांपैकी एक मानले गेले आहे वयुनेस्कोचेजागतिक वारसा स्थान आहे. फ्लोरेन्समध्ये अनेक कला दालने व संग्रहालये असून येथे दरवर्षी अंदाजे १५ लाखापेक्षा अधिक पर्यटक भेट देतात.