Movatterモバイル変換


[0]ホーム

URL:


Jump to content
मराठी विकिपीडियाएक मुक्त ज्ञानकोश
शोध

थायलंड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
थायलंड
ราชอาณาจักรไทย
थायलंडचे राजतंत्र
थायलंडचा ध्वजथायलंडचे चिन्ह
ध्वजचिन्ह
राष्ट्रगीत:Thai National Anthem - US Navy Band.oggफ्लेंग चात (सहाय्य·माहिती)
फ्लेंग चात
थायलंडचे स्थान
थायलंडचे स्थान
थायलंडचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी
(व सर्वात मोठे शहर)
बँकॉक
अधिकृत भाषाथाई[]
इतर प्रमुख भाषाइंग्लिश
सरकारघटनात्मक राजेशाही
संसदीय लोकशाही
 -राष्ट्रप्रमुखदहावा राम
 -पंतप्रधानअनुतिन चर्णविरकुल
महत्त्वपूर्ण घटना
 -स्वातंत्र्य दिवस(ख्मेर साम्राज्यापासून)
सुखोथाई राज्य - इ.स. १२३८ - इ.स. १३६८
अयुध्या राज्य - इ.स. १३५० - इ.स. १७६७
धोनपुरी राज्य - इ.स. १७६७ -एप्रिल ७,इ.स. १७८२
चक्री राजघराणे -एप्रिल ७,इ.स. १७८२ - अद्याप 
क्षेत्रफळ
 - एकूण५,१३,००० किमी (४९वा क्रमांक)
 - पाणी (%)०.४
लोकसंख्या
 - इ.स. २०१०६,५९,९८,४३६ (२०वा क्रमांक)
 -गणती{{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 -घनता१२६/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण५३९.८७१ अब्ज[]अमेरिकन डॉलर (२१वा क्रमांक)
 -वार्षिक दरडोई उत्पन्न८,४७८.१[]अमेरिकन डॉलर (६९वा क्रमांक)
मानवी विकास निर्देशांक  . ०.७८३[] (मध्यम) (८७ वा) (२००९)
राष्ट्रीय चलनथाई बात (THB) (฿)
आंतरराष्ट्रीय कालविभागयूटीसी+०७:००
आय.एस.ओ. ३१६६-१TH
आंतरजाल प्रत्यय.th
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक६६
राष्ट्र_नकाशा
राष्ट्र_नकाशा


थायलंडचे (थाई: ราชอาณาจักรไทย,राच्च आनाचक थाय, अर्थ:राज्य आज्ञाचक्र थाय) म्हणजेचसयाम हाआग्नेय आशियातील एक देश आहे. या देशाच्या पूर्वेसलाओसकंबोडिया, दक्षिणेसथायलंडचे आखातमलेशिया तर पश्चिमेसअंदमानचा समुद्रब्रह्मदेश आहेत.बँकॉक ही या देशाचीराजधानी व सर्वात मोठे शहर आहे. थायलंडमध्येघटनात्मक राजेशाही असली, तरीही प्रशासकीय कारभारसंसदीय लोकशाही पद्धतीने चालतो.

इतिहास

[संपादन]

वर्तमान थायलंडाच्या भूप्रदेशावर सुमारे ४०,००० वर्षांपासून मानवाचे वास्तव्य असल्याचे पुरावे आहेत. या प्रदेशातील संस्कृतीवर प्राचीन काळापासून - म्हणजे इ.स.च्या १ल्या शतकातीलफूनान राज्यापासून -भारतीय उपखंडातील संस्कृतीचा प्रभाव आहे. फूनान राज्यानंतर येथेख्मेर साम्राज्याची सत्ता इ.स.च्या १३व्या शतकापर्यंत चालली. ख्मेरांचे साम्राज्य लयास गेल्यावर काही काळ ताय, मोन, ख्मेर, मलय समूहांची छोटी छोटी राज्ये उभी राहिली. इ.स. १२३८ साली आजच्या थायलंडाच्या उत्तर भागातसुखोथाई साम्राज्य उदयास आले. ही सयाममधील पहिलीबौद्ध सत्ता मानली जाते. मात्र अवघ्या एका शतकानंतर (इ.स.च्या १४व्या शतकाच्या मध्यावर) दक्षिणेकडीलचाओ फ्रया नदीच्या तीरावर उदयास आलेल्याअयुध्या साम्राज्यानेसुखोथाई व परिसरातील अन्य सत्तांना झाकोळून टाकले. या साम्राज्याच्या काळात अयुध्या नगराचा व्यापारअरबी द्वीपकल्प,पर्शिया,भारत,चीन इत्यादीआशियाई व्यापारी केंद्रांशी, तसेचडच,पोर्तुगीज,ब्रिटिश इत्यादीयुरोपीय व्यापाऱ्यांसह देखील चाले.

इ.स. १७६७ सालच्या आक्रमणादरम्यानबर्मी सैन्याने अयुध्या लुटली, उद्ध्वस्त केली. तेव्हा राजातक्षिणाने अजून दक्षिणेस जाऊनचाओ फ्रया नदीच्या तीरावरच्याधोनपुरी या ठाण्यास आपली राजधानी हलवली व तेथून १५ वर्षे राज्य चालवले. इ.स. १७८२मध्येबुद्ध योद्फा चुलालोक या सेनाधिकाऱ्याने तक्षिणाची राजवट उलथूनचक्री घराण्याची सत्ता स्थापली व राजधानी म्हणूनबांकोकास निवडले.चक्री घराण्याच्या राजवटीपासूनच्या या काळासरतनकोशिन कालखंड असे अभिधान असून, थायलंडाच्या आधुनिक पर्वाचा तो आरंभ मानला जातो.

इ.स.च्या एकोणिसाव्या शतकातआशियाआफ्रिका खंडातील अन्य भूप्रदेशांत वसाहतवादाचा शिरकाव होत असताना मात्र थायलंड कधीच कोण्याही युरोपीय वसाहतवादी सत्तेपुढे नमला नाही.आग्नेय आशियातील वर्चस्वस्पर्धेतफ्रेंच व ब्रिटिश अश्या दोन्हीवसाहतवादी सत्तांशी चातुर्याने राजनैतिक व्यवहार जपत थायलंडाने आपले सार्वभौमत्व अबाधित राखले.

इ.स.च्या विसाव्या शतकातदुसऱ्या महायुद्धात थायलंडानेजपानास सहकार्य केले. मात्र महायुद्धोतर कालखंडात बह्वंशी काळ थायलंडअमेरिकेच्या मित्रपक्षात राहिला आहे.

भूगोल

[संपादन]

विस्ताराच्या दृष्टीने ५,१३,१२० वर्ग कि.मी. क्षेत्रफळ असलेला, आकारमानानुसारयेमेनपेक्षा काहीसा छोटा वस्पेनपेक्षा काहीसा मोठा विस्तार असलेला हा देश जगातला ५१व्या क्रमांकाचा मोठा देश आहे.

भूरचनेनुसार थायलंडमध्ये पर्वतीय प्रदेश, पठारी प्रदेश, नदीखोऱ्यांपासून, तसेच अगदी संयोगभूमीसारख्या भूरूपांपर्यंतचे वैविध्य आढळते. थायलंडच्या उत्तरेकडील भूभाग डोंगराळ आहे. येथीलथानोन धोंग्चाय पर्वतरांगांतील २,५६५ मी. उंचीचेतोय इंदानोन हे ठिकाण देशातील सर्वोच्च ठिकाण आहे. देशाच्याईशान्येकडीलईशान प्रांताचा व आसपासचा भागखोरात पठाराने व्यापला आहे. खोरात पठाराच्या पूर्वांगाने वाहणारीमेकोंग नदी थायलंडच्या पूर्वसीमेलगत वाहत जाते. देशाच्या मध्यभागातचाओ फ्रया नदीचे खोरे वसले असून या खोऱ्यातून ही दक्षिणवाहिनी नदीथायलंडच्या आखातास जाऊन मिळते.

थायलंडचा दक्षिणेकडील भूप्रदेशक्रा संयोगभूमीवर वसला आहे. क्राची संयोगभूमी थायलंडच्या मुख्य भूभागासमलय द्वीपकल्पाशी जोडते.

राजकीय विभाग

[संपादन]

मोठी शहरे

[संपादन]

समाजव्यवस्था

[संपादन]

धर्म

[संपादन]

बौद्ध धर्म हा केवळ थायलंडचाप्रमुख धर्मच नसून, तो देशाचाराष्ट्रधर्म (राजधर्म) देखील आहे. थायलंडमधील९५% लोकसंख्या ही बौद्ध धर्मीय आहे. येथे ख्रिश्चन, मुस्लिम व हिंदू अनुयायी अल्पप्रमाणात आढळतात. थायलंड देशालाबौद्ध भिक्खूंचा देश असेही म्हणतात, कारण येथे बौद्ध भिक्खूंची संख्या अन्य बौद्ध देशांमधील भिक्खूंपेक्षा सर्वाधिक आहे. या देशात ४०,००,००० पेक्षा अधिक बौद्ध भिक्खू आहेत.

वस्तीविभागणी

[संपादन]

शिक्षण

[संपादन]

शिक्षण

[संपादन]

सांस्कृृतिक इतिहास

[संपादन]

सयाम हे नाव श्याम या शब्दाचेच रूप आहे. कंबुज साम्राज्याच्या वैभव काळात सयाम हा या साम्राज्याचाच एक भाग होता.त्यामुळे सयामवर अर्थातच हिंदू संस्कृतीचा प्रभाव पडलेला दिसतो. भारतात जितक्या पद्धतींचीबौद्ध मंदिरे आणिबुद्ध मूर्ती आहेत त्या बहुतेक सर्व प्रकारच्या मूर्ती आणि मंदिरांचे शिल्प सयाम मधील प्राचीन अवशेषात आढळून येतात. या नगरीचे प्राचीन अवशेष प्राचीन भारतीय संस्कृतीचा परिचय करून देतात. सयामच्या भाषेवरसंस्कृतचा प्रभाव आहे.त्यांची राजभाषा सयामी असली तरी धर्मभाषा मात्र पाली आहे.या जनजातीने या राज्याची निर्मिती केली.मोन हे मूळचेआंध्र प्रदेशातील तेलंगी .ब्रह्मदेशात त्यांनी आपल्या वसाहती स्थापन केल्या,तिथूनच ते श्याम देशात आले. पारंपरिक धारणेनुसार द्वारावती राज्याची राजधानी लोबपुरी हिची स्थापना इ.स. ५७५ मध्ये झाली. हिलाच लवपुरी असेही म्हणतात.या नगरीत ख्मेर आणि थायी राजांच्या राजवाडे,प्रासाद आणि मंदिरांचे अवशेष आहेत.सुमारे तीनशे वर्षे मोन साम्राज्य वैभवसंपन्न होते.नंतर मोन राजे कंबुज राजांचे मांडलिक झाले.

इ.स.१२८३ मध्ये राम कामेंग हा राजा गादीवर आला.सयामच्या वैशिष्ट्यपूर्ण जडणघडणीची सुरुवात याच्याच कारकिर्दीत झाली.प्रजेच्या हितासाठी त्याने अनेक सुधारणा केल्या.हा राजा स्वतः बौद्ध धर्माचा उपासक होता. त्याने बौद्धविहार आणि चैत्य बांधलेविवान भिक्षू या विहारांमधून ज्ञान देऊ लागले.भारतीय साहित्य आणि तत्त्वज्ञान यांचा अभ्यास सयाममध्ये होत असे. राजा राम कामेंग याने संस्कृत आणि पाली यांच्याशी मिळतीजुळती सयामी भाषा प्रचारात आणली. १३५० मध्ये सयामच्या पश्चिम भागात रामाधिपती नाव धारण करून एका पराक्रमी राजाने आपली सत्ता वाढविली. द्वारावती ही त्याची नगरी. त्याने राजधानीचे नाव अयोध्या असे ठेवले. रामाधिपती हा राजा शूर आणि मुत्सद्दी होता. तो बौद्ध धर्माचा अनुयायी असला तरीशंकर आणिविष्णू यांचीही उपासना करी. त्याने शिव आणि विष्णू यांचीमंदिरे बांधली आहेत. त्यानेत्रिपिटक,वेद शास्त्रागम या सर्वांचा अभ्यास केलेला होता. त्याच्या शासनाचा नैतिक पाया होता मनुस्मृती हा ग्रंथ.[संदर्भ हवा] सयामचे कायदेही या आधारावर निर्माण झाले आहेत.[]बुद्ध धम्माची बौद्ध संस्कृती येथे विराजमान आहे. देशातील प्रत्येक घरासमोरच भगवान बुद्ध यांचे चित्र लावलेले असते.

राष्ट्रीय ग्रंथ

[संपादन]

रामायण हा थायलंडचा राष्ट्रीय ग्रंंथ आहे असे मानले जाते. सयामच्या राष्ट्रीय जीवनात रामायण-उत्सवांना विशेष स्थान आहे. रामायणातील कथाप्रसंग हे थायलंडमधील नाट्य आणि लोकनाट्याचे विशेष विषय आहेत.वाल्मिकीकृत रामायणापेक्षा थाई रामायणाचे कथानक काहीसे वेगळे आहे.

अर्थतंत्र

[संपादन]

पर्यटन हा या देशाचा मुख्य व्यवसाय आहे

वाहतूक

[संपादन]

थाई एअरवेजचा प्रमुख वाहतूकतळ असलेलाबँकॉकमधीलसुवर्णभूमी विमानतळ हा थायलंडमधील सर्वात मोठा व वर्दळीचाविमानतळ आहे.

खेळ

[संपादन]
राजामंगला राष्ट्रीय स्टेडियम हे थायलंडमधील सर्वात मोठे स्टेडियम आहे.

फुटबॉल हा सध्या थायलंडमधील लोकप्रिय खेळ आहे.ए.एफ.सी. फुटबॉल मंडळाचा सदस्य असलेल्या थायलंडने१९७२२००७ सालीए.एफ.सी. आशिया चषक स्पर्धेचे आयोजन केले होते.थायलंड फुटबॉल संघाने आजवर ६ वेळा आशिया चषकामध्ये पात्रता मिळवली आहे.बँकॉकने आजवरआशियाई खेळ स्पर्धांचे विक्रमी चार वेळा आयोजन केले आहे (१९६६,१९७०,१९७८१९९८).

संदर्भ

[संपादन]
  1. ^CIA — The World Factbook -- Thailand. 2009-10-03.https://www.cia.gov/library/publications/the-world-factbook/geos/th.htmlArchived 2010-12-29 at theवेबॅक मशीन.
  2. ^ab"Thailand".2010-04-21 रोजी पाहिले.
  3. ^"Human Development Report 2009. Human development index trends: Table G"(PDF).2009-10-05 रोजी पाहिले.
  4. ^डाॅॅ.हेबाळकर शरद,भारतीय संंस्कृृतीचा विश्वसंंचार,भारतीय विचार साधना प्रकाशन

बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:
मध्य आशिया
मध्य आशिया
कझाकस्तानकिर्गिझस्तानउझबेकिस्तानताजिकिस्तानतुर्कमेनिस्तानपूर्व आशिया
पूर्व आशिया
चीनउत्तर कोरियादक्षिण कोरियाजपानमंगोलियातैवान
मध्यपूर्व
मध्यपूर्व
सौदी अरेबियाबहरैनसंयुक्त अरब अमिरातीइराणइराकइस्रायलजॉर्डनकुवेतलेबेनॉनओमानकतारसीरियायेमेनआग्नेय आशिया
आग्नेय आशिया
म्यानमारब्रुनेईकंबोडियाइंडोनेशियालाओसमलेशियाफिलिपाईन्ससिंगापूरथायलंडव्हियेतनाम
दक्षिण आशिया
दक्षिण आशिया
अफगाणिस्तानबांगलादेशभूतानभारतमालदीवनेपाळपाकिस्तानश्रीलंकाउत्तर आशियासायबेरिया (रशिया)
काही भाग युरोपातकाही भाग आफ्रिकेतकाही भाग ओशानियामध्ये


"https://mr.wikipedia.org/w/index.php?title=थायलंड&oldid=2635888" पासून हुडकले
वर्ग:
लपविलेला वर्ग:

[8]ページ先頭

©2009-2026 Movatter.jp