तब्रिझ (फारसी:تبریز </link> , </link></link> ) हे वायव्यइराणच्यापूर्व अझरबैजान प्रांतातील एक शहर आहे. तब्रिझ प्रांत, काउंटी आणि जिल्ह्याची राजधानी आहे.[१]
ताब्रिझ हे इराणच्या ऐतिहासिकअझरबैजान प्रदेशातीलकुरु नदीच्या खोऱ्यात वसलेले आहेसहंद आणिआयनाली पर्वतांमधील ज्वालामुखीच्या शंक्वाकृती उंच शिखरांच्या मध्ये असलेले तब्रिझ समुद्रसपाटीपासून १,३५०-१,६०० मी उंचीवर आहे.
तब्रिझची लोकसंख्या १७ लाख आसून हे[२] हे वायव्य इराणमधील सर्वात मोठे आर्थिक केंद्र आणि महानगर आहे. येथील लोकसंख्या द्विभाषिक आहे आणि बहुतेक लोकअझेरी ही त्यांची मूळ भाषा आणिफारसी बोलतात..[३] येथे मोटारगाड्या, मशीन टूल्स, रिफायनरी, खनिज तेल, कापड आणि सिमेंट उत्पादन उद्योग आहेत.[४] हे शहर हाताने विणलेले गालिचे आणि दागिन्यांवरील कलाकुसरीसाठी प्रसिद्ध आहे. स्थानिक मिठाई, चॉकलेट, सुका मेवा आणि पारंपारिक तबरीझी खाद्यपदार्थ इराणमध्ये सर्वोत्कृष्ट गणले जातात.
१६व्या शतकातील तब्रिझचा नकाशा मे २०१२मधील ईशान्य तबरीझचे विहंगम दृश्य
१५०१ मध्ये तब्रिझ येथे राज्याभिषेक झाल्यानंतर,शाह इस्माईल नेशिया इस्लामचीइस्रा अशरी शाखासफवी साम्राज्याचा अधिकृत धर्म म्हणून घोषित केली. याचा परिणाम म्हणून, तबरीझमधील बहुसंख्यसुन्नी लोकसंख्या जबरदस्तीने शिया धर्मात रुपांतरित झाली.[५][६] सध्या, बहुसंख्य लोक शिया इस्लामचे अनुयायी आहेत.
^John A A Boyle (Editor), Persia: History and Heritage, Routledge, 2011, p:38
^Melissa L. Rossi (2008),What Every American Should Know about the Middle East, Penguin,आयएसबीएन978-0-452-28959-8,Forced conversion in the Safavid Empire made Persia for the first time dominantly Shia and left a lasting mark: Persia, now Iran, has been dominantly Shia ever since, and for centuries the only country to have a ruling Shia majority.