जून १ हाग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील१५२ वा किंवालीप वर्षात१५३ वा दिवस असतो.
१ जून हा भारतातील अनेकजणांचा जन्मदिनांक असतो. आज २०१७ साली हयात असलेल्या पाचपैकी किमान एका वृद्धाचा १ जून हा वाढदिवस असतो.
पूर्वी जन्म-मृत्यूच्या तारखेची नोंदणी करण्याबाबत एवढी जागरूकता नव्हती. तेव्हा आपले मूल कोणत्या दिवशी, कोणत्या तारखेला जन्माला आले हे अनेक आईवडिलांच्या लक्षातही नसायचे. तेव्हा आतासारखी बाळंतपणे रुग्णालयात होत नसत, त्यामुळे जन्मतारीख, वेळ, दिवस यांची नोंदणी ठेवण्याचा प्रश्नच यायचा नाही. पुढे ही मुले जेव्हा मोठी झाली, शाळेत जाण्याची वेळ आली तेव्हा अनेकांना आपली जन्मतारीखच माहिती नसायची. तेव्हा अशा मुलांना शाळेचे गुरुजी १ जून ही जन्मतारीख देत. त्यामुळे शाळेत प्रवेश घेणे सोपे होई. काहींचे वडील फिरतीची आणि बदलीची नोकरी करणारे होते. त्या गोंधळात महत्त्वाची कागदपत्रे देखील हरवायची. त्यामुळे मुलांच्या जन्मतारखेची नोंद असलेली कागदपत्रेही सापडायची नाहीत. पुढे शाळेत किंवा नोकरीच्या ठिकाणी प्रवेश प्रक्रिया पूर्ण करताना अडचणी यायच्या. त्यामुळे ही मुले कोणत्याही महिन्यात जन्मलेली असली तरी सबळ पुरावा नसल्याने त्यांची जन्मतारीख १ जूनच केली जायची. त्यामुळे भारतातील अनेकांचा वाढदिवस १ जूनला येतो.
कामगार नेते डॉ.बाबा आढाव यांच्यासह डॉ.आ.ह. साळुंखे,रंगनाथ पठारे, डॉ.रमेश धोंडगे,राजन गवस,लक्ष्मण माने,व.बा. बोधे,शरणकुमार लिंबाळे आदी मराठी साहित्यिकांची जन्मतारीख १ जून आहे.
- १०७६ -म्स्तिस्लाव पहिला, कीयेवचा राजा.
- १८०४ -ब्रिगहॅम यंग,मॉर्मोन चर्चचा संस्थापक.
- १८१५ -ओट्टो, ग्रीसचा राजा.
- १८३१ -जॉन बेल हूड, अमेरिकेतील दक्षिणेचा सेनापती.
- १९०७ -फ्रँक व्हिटल,जेट इंजिनचा शोधक.
- १९१७ -विल्यम एस. नौल्स,नोबेल पारितोषिक विजेताअमेरिकन रसायनशास्त्रज्ञ.
- १९२९ -नर्गिस दत्त,भारतीय अभिनेत्री.
- १९३७ -मॉर्गन फ्रीमन, अमेरिकन अभिनेता.
- १९७० -आर. माधवन,हिंदी चित्रपट अभिनेता.
- १९७३ -हाइडी क्लुम, जर्मन मॉडेल.
- १९८२ -जस्टिन हेनिन-हार्डिन,बेल्जियमची टेनिस खेळाडू.
मे ३० -मे ३१ -जून १ -जून २ -जून ३ (जून महिना)