खो-खो हा एक पारंपरिकभारतीय मैदानी खेळ आहे. हा प्राचीन भारतातील सर्वात जुन्या मैदानी खेळांपैकी एक आहे.भारतीय उपखंडातील दोन सर्वात लोकप्रिय पारंपरिक टॅग खेळांमध्ये खो-खो आणिकबड्डीचा समावेश होतो.[१]
खो-खो दोन संघांद्वारे खेळला जातो, ज्यामध्ये पंधरापैकी बारा खेळाडू असतात. यातले नऊ खेळाडू गुडघ्यांवर बसून मैदानात प्रवेश करतात (चेझिंग टीम) ,आणि तीन अतिरिक्त (बचाव करणारा संघ) खेळाडू विरोधी संघाच्या सदस्यांचा स्पर्श टाळण्याचा प्रयत्न करतात.
खो-खो खेळताना मुली. चित्र: २०१३ | |
| माहिती | |
|---|---|
| संघ सदस्य | १२; पैकी ९ मैदानात, ३ राखीव |
| वर्गीकरण | मैदानी |
| साधन | नाही |
| मैदान | खो खो मैदान |
| ऑलिंपिक | नाही |
हा खेळ संपूर्णदक्षिण आशियामध्ये मोठ्या प्रमाणावर खेळला जातो.दक्षिण आफ्रिका आणिइंग्लंड यांसारख्या दक्षिण आशियाच्या बाहेरील प्रदेशांमध्येही तो खेळला जातो. हाभारत आणिपाकिस्तानमधील शाळकरी मुलांद्वारे नेहमी खेळला जातो, हा एक स्पर्धात्मक खेळ आहे.[२] खो-खो असा खेळ आहे जो तग धरण्याची क्षमता वाढविण्यास मदत करतो आणि शालेय मुलांच्या सामाजिक आणि मानसिक विकासास मदत करतो.


हे नाव मराठी भाषेतील खो-खो[३] वरून आले आहे. "खो" हा शब्द एक आवाज आहे, जो खेळत असताना वापरला जातो. याला "खो देणे" असे म्हणतात.[४]

खो-खोची सुरुवात नेमकी कधी झाली हे कळणे कठीण आहे. खो खो या खेळाचा उगम महाराष्ट्राच्या या मातीतच खऱ्या अर्थाने झाला. पकडापकडीच्या खेळातून उत्क्रांती होत ह्या खेळाचा जन्म झाला असावा. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला ह्या खेळात सुसूत्रता आणण्यास सुरुवात झाली. १९१४ साली पुणे जिमखाना येथे खो-खोचे नियम बनवण्यासाठी एका समितीची स्थापना झाली. १९२४ साली बडोदा जिमखान्याने खो-खोची नियमावली प्रसिद्ध केली. १९५९-६० साली भारत सरकारनेआंध्रप्रदेशातील विजयवाडा येथे खो-खोची पहिली राष्ट्रीय स्पर्धा आयोजित केली. खो-खोच्या प्रतिभावंत खेळाडूंना भारत सरकारकडून पुढील पुरस्कार मिळतात.
खो-खोमध्ये दोन संघ असतात. प्रत्येक संघात १२ खेळाडू असतात. परंतु एका वेळेस ९ खेळाडू खेळतात. खेळ दोन भागांमध्ये विभागला जातो. दोन भागांमध्ये ५ मिनिटे विश्रांतीचा कालावधी असतो. प्रत्येक भागात पुन्हा दोन उपभाग असतात. त्यातील पहिल्या उपभागात पहिला संघ पाठलाग करतो व दुसरा संघ बचाव करतो. दुसऱ्या उपभागात पहिला संघ बचाव करतो तर दुसरा पाठलाग करतो. दोन्ही उपभगांमध्ये २ मिनिटे विश्रांतीचा काळ असतो. थोडक्यात, संपूर्ण खेळ साधारणतः ३७ मिनिटे (७+२+७+५+७+२+७) चालतो.
खेळाच्या सुरुवातीला पाठलाग करणाऱ्या संघाचे आठ खेळाडू दोन खांबांमधील आठ चौकोनांत आळीपाळीने विरुद्ध दिशांना तोंड करून बसतात. नववा खेळाडू कोणत्याही एका खांबाजवळ उभा राहतो.बचाव करणाऱ्या संघाचे तीन खेळाडू मैदानात असतात. खेळ सुरू झाल्यावर पाठलाग करणाऱ्या सघाचा नववा खेळाडू बचाव करणाऱ्या संघाच्या तीन खेळाडूंना बाद करण्याचा प्रयत्न करतो. पाठलाग करणाऱ्या खेळाडूवर खालील बंधने असतात.
वरील प्रकारे खो-खोची साखळी सुरू रहाते.
बचाव करणाऱ्या खेळाडूवर मैदानात पळताना कोणतेही निर्बंध नसतात. कोणताही बचाव करणारा खेळाडू खालील प्रकारांनी बाद होऊ शकतो
बचाव करणाऱ्या संघाचे तीनही खेळाडू बाद झाल्यावर पुढचे तीन खेळाडू मैदानात प्रवेश करतात. नवीन खेळाडूंनी पुढचा खो देण्याआधी मैदानात उतरणे आवश्यक असते. अन्यथा त्यांना बाद धरण्यात येते.
बाद केलेल्या प्रत्येक खेळाडूया बदली प्रतिस्पर्धी संघाला एक गुण मिळतो. पहिल्या भागाच्या अखेरीस प्रत्येक संघाचे गुण बघितले जातात. ज्या संघाचे गुण जास्त, त्या संघाची विरुद्ध संघावर दोन्ही संघांमधील गुणांच्या फरकाइतकी आघाडी धरली जाते. दुसऱ्या भागाच्या अखेरीस, जो संघ आघाडी मिळवितो तो संघ त्या आघाडीने विरुद्ध संघावर मात करतो. हा खेळ चांगला आहे.
भारतामध्ये खो-खोच्या खालील स्पर्धा आयोजित केल्या जातात. काही भारतीय खो खो खेळाडू सतीश राय, सारिका काळे, पंकज मल्होत्रा, मंदाकिनी माझी, प्रवीण कुमार.