Movatterモバイル変換


[0]ホーム

URL:


Jump to content
मराठी विकिपीडियाएक मुक्त ज्ञानकोश
शोध

काळवीट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
काळवीट

प्रजातींची उपलब्धता
शास्त्रीय वर्गीकरण
वंश:कणाधारी
जात:सस्तन
वर्ग:युग्मखुरी
कुळ:गवयाद्य
जातकुळी:Antilope
जीव:A. cervicapra
शास्त्रीय नाव
Antilope cervicapra
काळवीट

काळवीट हे हरीण प्रामुख्याने भारतात आढळून येते. हे हरिणांच्याकुरंग हरीण कुळातील प्रमुख हरीण आहे. नर काळवीट हा काळ्या रंगाचा असून मादी ही भुऱ्या रंगाची असते. नरांना प्रामुख्याने शिंगे असतात. माद्यांना शिंगे नसतात.

वावर

[संपादन]

काळविटाचा वावर मुख्यत्वे भारतातील शुष्क प्रदेशातील ओसाड माळरानांवर आहे. महाराष्ट्रात विशेषतः पश्चिममहाराष्ट्रातील पर्जन्य छायेतील प्रदेशात यांचे वास्तव्य आहे.अहमदनगर जिल्ह्यातीलकर्जत तालुक्यातील रेहेकुरी येथे काळविटांचे अभयारण्य आहे. पुणे जिल्ह्यातील दुष्काळी दौंड इंदापूर, शिरुर, बारामती तालुक्यात व तसेच अहमदनगर व सोलापूर जिल्ह्यामध्ये ही हरणे दिसतात. सोलापूर जिल्ह्याच्या लगतच्या आंध्रप्रदेशात, व लगतच्या कर्नाटकात, राजस्थानातन व मध्यप्रदेशातही काळविटे बऱ्याच प्रमाणात दिसून येतात.

संदर्भ व नोंदी

[संपादन]
  1. ^Mallon, D.P. (2008).Antilope cervicapra.इ.स. २००६असुरक्षित प्रजातींची आय.यू.सी.एन. "लाल" यादी.आय.यू.सी.एन. इ.स. २००६. ला बघितले.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दातविस्तार करण्यास मदत करा.विस्तार कसा करावा?
"https://mr.wikipedia.org/w/index.php?title=काळवीट&oldid=2496849" पासून हुडकले
वर्ग:
लपविलेला वर्ग:

[8]ページ先頭

©2009-2026 Movatter.jp