ओसिॲनस (ग्रीक: Ὠκεανός ओकिआनॉस) हा ग्रीक पुराणांनुसारगैय्या (पृथ्वी) व युरेनस (आकाश) यांच्यापासून जन्मलेलाटायटन देव होता. त्याने त्याची बहिण टेथिस हिच्याशी विवाह केला. टेथिस आणि ओसिॲनसने 'नदी देव' समजल्या जाणाऱ्या अनेक देवांचा आणि तीन हजार समुद्री अप्सरांना जन्म दिला.[१]
ग्रीक लोक ओसिॲनसला समुद्राचे मूर्त स्वरूप मानत. तसेच जगाच्या भोवती लपेटलेली महाकाय नदी हे त्याचे रूप आहे, असे समजत असत.