इराण हामध्यपूर्वेतील एकदेश आहे. इराणचे पूर्वीचे नाव पर्शिया असे होते.पर्शियन संस्कृती जगातील सर्वात प्राचीन संस्कृतीपैकी एक आहे. खनिज तेल साठयात संपूर्ण जगात क्रमांक तिसरा तर वायुसाठ्यात दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे.इराकविरुद्ध ९ वर्षे चाललेले युद्ध यादेशाने केले.
ईरान मध्ये, फारसी, अझरबैजान, कुर्दिश (कुर्डिस्तान) आणि लूरे हे सर्वात महत्त्वाचे जातीय गट आहेत
ईरान मध्ये, फारसी,अझरबैजान, कुर्दिश (कुर्डिस्तान) आणि लूरे हे सर्वात महत्त्वाचे जातीय गट आहेत
इराण, इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणचे अधिकृत नाव असलेला, पश्चिम आशियातील एकदेश आहे. हादेश वायव्येकडून तुर्कस्तान,आर्मेनिया आणिअझरबैजान प्रजासत्ताक, उत्तरेकडूनकॅस्पियन समुद्र, ईशान्येकडूनतुर्कमेनिस्तान, पूर्वेकडूनअफगाणिस्तान, आग्नेयेकडूनपाकिस्तान आणिओमान समुद्र आणि दक्षिणेकडूनपर्शियन गल्फ यांच्या सीमेवर आहे. आणिहोर्मुझची सामुद्रधुनी पश्चिमेकडूनइराकला लागून आहे. 1,648,195 चौरस किलोमीटर क्षेत्रफळ असलेला, हा देशमध्य पूर्वेतील दुसऱ्या क्रमांकाचा आणिजगातील 18 वा सर्वात मोठा देश आहे. इराणचीलोकसंख्या 86 दशलक्षाहून अधिक आहे आणि सर्वात जास्तलोकसंख्या असलेल्या देशात ते 17 व्या क्रमांकावर आहे. इराण 31 प्रांतांमध्ये विभागलेला आहे. या देशाची अधिकृत भाषा फारसी आहे. इराणमधील सर्वात मोठी शहरे अनुक्रमेतेहरान (राजधानी),मशहद,इस्फाहान, काराज आणिशिराज आहेत.
"इराण" हा शब्द थेट मध्य पर्शियन "एरान" पासून आला आहे. एरान हा शब्द पहिल्यांदा रुस्तम शिल्पाकृतीतील तिसऱ्या शतकातील शिलालेखात प्रथम सापडतो. इराणच्या लोकांसांदर्भात "आर्यन" या शब्दाचा वापर करणारा पार्थियन शिलालेखही सोबत सापडला आहे. एका इराणी पौराणिक कथेनुसार, देशाचे नाव इराज ह्या प्रख्यात राजपुत्राच्या नावावरून ठेवले आहे.
ऐतिहासिकदृष्ट्या, इराणला पश्चिमी देशांत पर्शिया म्हणून संबोधिले गेले आहे, प्रामुख्याने ग्रीक इतिहासकारांच्या लेखनामुळे ज्यांनी इराणचा संपूर्ण उल्लेख "पर्सिस" नावाने केला होता. अर्थात "पर्शियन लोकांची भूमी." पर्सीस इराणमधील प्राचीन प्रांतांपैकी एक होता, ज्याची व्याख्या आज फार्स म्हणून केली जाते.
१९३५ साली रेझा शाह यांनी आंतरराष्ट्रीय समुदायाला देशाचे मूळ नाव "इराण" वापरण्यास विनंती केली.
मोहम्मद मोसादिक यांच्या नेतृत्वाखाली , १९५३ साली लोकशाहीवादी चळवळ दडपली गेली यामध्ये अमेरिकेच्या सी आय एचा हात होता असे मानतात कारण त्यांना इंग्लंड व अमेरिकेचे संबंध जपायचे होते. १९७९ मध्ये इराणमध्ये इस्लामी क्रांती घडवून शहा रेझा पहलवी यांना पदच्युत केले गेले त्यानंतर अयातुल्ला खोमेनी इराण मध्ये परतले. त्यांनी इराणचे कट्टर इस्लामीकरण केले
पारशी - इराण मध्ये अरब मुस्लिमांनी आक्रमण केल्यावर झरत्रुष्ट्र धर्म मानणाऱ्यांचा एक गट तिथून इ.स ८०० च्या दरम्यान निसटला. या गत तेथून भारतात येऊनगुजरात राज्यात वसला. यांनाच आजच्या काळातपारशी असे म्हणतात. या शिवायही इराण येथील याझ्द प्रांतात झरत्रुष्ट्र धर्म मानणारे काही टिकून राहिले. सतराव्या शतकात उरल्यासुरल्या पारशी लोकांचा कट्टर मुस्लिमांकडून छळ सुरू झाला. सुमारे १८५० नंतर यातील अजून काही लोक भारतात आले. त्यांना इराणी म्हणतात.मुंबई येथील अनेकइराणी उपहारगृहे हीच मंडळी चालवीत असत.
इराण मध्ये मोठ्या प्रमाणातखनिज तेल असल्याने अनेक राष्ट्रांना इरानच्या राजकारणात रस आहे. हे तेल इराण आपल्याला आणि आपण सांगू त्याच भावात विकावे यासाठी मोठा आंतराष्ट्रीय दबाव इराणवर टाकण्यात येत असतो. अणु कार्यक्रमाची सुरुवात केल्याने. इराणवरअमेरिका व इतर राष्ट्रांनी निर्बंध लादले आहेत. परंतुभारत मात्र येथील नैसर्गिक वायू पाईपलाईन द्वारे मिळवत आहे. त्यासाठीचे मूल्यरुपयात अदा करता येईल अशी व्यापारी रचनाही आता अस्तित्वात आणण्यात आली आहे.इराणमध्ये केशराचे उत्पादनही होते. इराण मध्ये पिकणारेकेशर हे स्वाद आणि रंगात अव्वल मानले जाते.