आफ्रिका हा आकाराने आणि लोकसंख्येनेआशियानंतर, क्रमांक दोनचा भौगोलिक खंड आहे. त्याचे जवळच्या बेटांसह एकूण क्षेत्रफळ तीन कोटी दोन लाख चौरस किलोमीटर आहे. हा खंड पृथ्वीचा सहा टक्के पृष्ठभाग व्यापतो. पृथ्वीतलावरील एकूण जमिनीच्या २०.४ टक्के जमीन या खंडात येते. इ. स. २००९ मध्ये आफ्रिकेची लोकसंख्या सुमारे एक अब्ज, म्हणजेच पृथ्वीवरील लोकसंख्येच्या १४.७२ टक्के एवढी होती.
आफ्रिकेच्या उत्तरेलाभूमध्य समुद्र, ईशान्येला सुएझ कालवा,लाल समुद्र आणिसिनाई द्वीपकल्प आहेत. आग्नेयेला हिंद महासागर आणि पश्चिमेलाअटलांटिक महासागर आहेत. मादागास्कर आणि इतर बेटांचे समुह मिळून खंडात एकूण ५६ सार्वभौम देश आणि दोन मान्यता नसलेले देश आहेत.
आफ्रिकेत, विशेषतः पूर्व आफ्रिकेत मानववंशाची सुरुवात झाली अशी वैज्ञानिक समुदायाची मान्यता आहे. ग्रेट एप्सच्या रूपात त्यांची सुरुवात सुमारे सत्तर लाख वर्षांपूर्वी झाली असावी, असा अंदाज त्या भागात सापडलेल्या सर्वात जुन्या मानवी अवशेषांवरून करण्यात आला आहे. मानवाचे (होमो सेपियन्स) अस्तित्त्व दोन लाख वर्षांपूर्वी इथिओपिया देशात असल्याचे संशोधनात दिसून आले आहे.
विषुववृत्ताच्या दोन्ही बाजूंना पसरलेला आफ्रिका हा खंड आहे. आफ्रिकेत विविध भौगोलिक प्रदेश दिसून येतात. उत्तर आणि दक्षिण दोन्ही उष्ण कटिबंध सामावणारा आफ्रिका हा एकमेव खंड आहे.
फोनेशियन ही भूमध्यसमुद्राच्या सभोवतालच्या प्रदेशात बोलली गेलेली एक प्राचीन भाषा आहे. या भाषेतीलअफार (धूळ) हा शब्द आफ्रिका शब्दाच्या जवळ जाणारा आहे. उत्तर आफ्रिकेत कमी पर्जन्यमानामुळे अनेक प्रदेशात धुळीचे अस्तित्त्व मोठ्या प्रमाणात आजही दिसते. त्याचप्रमाणेएप्रिका (खूप सूर्यप्रकाश असलेला) यालॅटिन शब्दातही या शब्दाचे मूळ शोधले जाते. याखेरीज इतरही अनेक शब्दांमध्ये आफ्रिका शब्दाचे नामसाधर्म्य दिसून येते.
सरीसृपांचे युग अशी ओळख असलेल्यामेसोझोईक काळात म्हणजे सुमारे २५ कोटी ते ६.५ कोटी वर्षांपूर्वीच्या काळात आफ्रिकेत अवाढव्य आकाराच्या प्राण्यांचे अस्तित्त्व होते.डायनोसॉरचे जीवसृष्टीत प्राबल्य असलेला ज्युरासिक कालखंड याच युगाचा एक भाग होता. त्या काळातील प्राण्यांचे अवशेष आफ्रिकेत अनेक ठिकाणी सापडले आहेत. खंडाच्यापूर्व किनाऱ्यालगत असलेल्यामादागास्कर या प्रचंडबेटवजादेशामध्ये आढळलेल्या डायनॉसॉरसच्या पायांच्या अवशेषावरून, डायनॉसॉरसमांसाहारी होते या कल्पनेला पुष्टी मिळाली आहे.[१]
आफ्रिका हापृथ्वीवर मनुष्यवस्ती असलेला सर्वात जुना भूभाग आहे. आफ्रिकेचाइतिहास म्हणजे मानवाचा इतिहास असे म्हणले जाते.आदिमानवाचा अर्थातहोमो इरेक्टसच्या जीवनाचाही प्रारंभ १७ लाख ५० हजार वर्षांपूर्वी आफ्रिकेतूनच झाला असे संशोधक मानतात. त्यानंतर आजच्या आधुनिक माणसाचा अर्थातहोमो सपायन्सच्या जीवनाचा प्रारंभ जवळपास ३० ते ४० हजार वर्षांपूर्वी याच खंडात झाला. येथून पुढच्या काळातउत्तरेलायुरोप आणि पूर्वेलाआशियाखंडात मानवी वस्ती विस्तारत गेली.
इसवी सनाच्या सातव्या शतकापासूनअरबस्थानात स्थापन झालेल्याइस्लाम धर्माचा प्रभाव इजिप्तपर्यंत आणि नंतर आफ्रिकेत दक्षिण बाजूला विस्तारत गेला. त्याने आफ्रिकेत नव्याच संस्कृतीची भर घातली. नवव्या शतकापासून युरोपीयांनी आफ्रिकेत जम बसवला.
गुलामगिरीच्या अमानवी प्रथेला आफ्रिकेत मोठा इतिहास आहे. खंडाच्या पूर्व भागात, इसवी सनाच्या दुसऱ्या सहस्रकाच्या सुरुवातीपासून अरबांचा गुलाम व्यापार (अरब स्लाव्ह ट्रेड) चालत होता. सोळाव्या शतकापासून १९ व्या शतकापर्यंत आफ्रिकेच्या पश्चिम भागातून अटलांटिक स्लाव्ह ट्रेड चालला.
एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात युरोपातील राजकीय शक्तींनी आफ्रिकेतील वेगवेगळा प्रदेशात आपल्या सत्तेचा विस्तार करणे सुरू केले. त्यासाठी आपापसात संघर्ष झाले. या संघर्षांची परिणती म्हणून संपूर्ण आफ्रिका युरोपीय शक्तिंच्या वसाहतींनी व्यापला. या वसाहतवादातून आफ्रिका खंडातील देश मुक्त होण्याची प्रक्रियाइ.स. १९५३ मध्ये लिबियापासून सुरू झाली.इ.स. १९९३ पर्यंत आफ्रिका खंडातील बहुतांश देश स्वतंत्र झाले.
आफ्रिका खंड जगात सर्वाधिक निर्धन आणि अविकसित राहिला आहे. त्यामागे अनेक कारणे आहेत. आजारांच्या साथी आणि विषाणूंचा फैलाव, मानवी हक्कांचे उल्लंघन, लाचखोर सरकारे, मध्यवर्ती नियोजनाचा अभाव, निरक्षरता, परदेशी भांडवलापर्यंत मर्यादितच पोहोच, जमाती-जमातींत किंवा लष्करांमधील संघर्ष ही त्यापैकी काही प्रमुख कारणे आहेत.
^The Spanishexclave ofCeuta is surrounded on land by Morocco in Northern Africa; population and area figures are for 2001.
^The PortugueseMadeira Islands are often considered part of Northern Africa due to their relative proximity to Morocco; population and area figures are for 2001.
^The Spanishexclave ofMelilla is surrounded on land by Morocco in Northern Africa; population and area figures are for 2001.
^Bloemfontein is the judicial capital of South Africa, whileCape Town is its legislative seat, andPretoria is the country's administrative seat.