ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही.विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाचीउल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेखकाढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. संदर्भ कसे निवडावेत याची माहितीयेथे मिळेल तर संदर्भ कसे जोडायचे याची माहिती आपल्यालायेथे मिळेल.
अलास्का हेअमेरिकेच्या ५० राज्यांपैकी एक आहे. अलास्का वहवाई ही दोन राज्ये अमेरिकेच्या एकमेकांशी संलग्न असलेल्या अन्य ४८ राज्यांपासून वेगळी पडली आहेत. अलास्काच्या पूर्वेलाकॅनडा देशाचेयुकॉन वब्रिटिश कोलंबिया हेप्रांत, उत्तरेलाआर्क्टिक महासागर व पश्चिम व दक्षिणेलाप्रशांत महासागर आहे. पश्चिमेलाबेरिंगची सामुद्रधुनी अलास्कालारशियापासून वेगळे करते. क्षेत्रफळाच्या दृष्टीने अलास्का हे अमेरिकेचे सर्वात मोठे राज्य आहे, परंतुलोकसंख्या घनतेच्या दृष्टीने अलास्का अमेरिकेतील सर्वात तुरळक लोकवस्तीचे (०.४९ व्यक्ती प्रति चौरस किमी) राज्य आहे.
इ.स. १८६७ साली अमेरिकेने अलास्का प्रदेशरशियन साम्राज्याकडून ७२ लाख डॉलर्स किंमतीला विकत घेतला. ११ मे १९१२ रोजी अलास्काला अमेरिकेचा एक प्रदेश बनवण्यात आले तर ३ जानेवारी १९५९ रोजी अलास्का अमेरिकन संघामधील ४९वेराज्य बनले.जुनू ही अलास्काची राजधानी तरॲंकरेज हे येथील सर्वात मोठे शहर व महानगर आहे. अलास्कामधील ५० टक्के रहिवासी ॲंकरेज महानगर क्षेत्रामध्येच राहतात.
अलास्काची अर्थव्यवस्थाखनिज तेल,नैसर्गिक वायू वमासेमारी ह्या नैसर्गिक संपत्तीवर अवलंबून असून येथील वार्षिक दरडोई उत्पन्न अमेरिकेमध्ये चौथ्या क्रमांकावर आहे.